शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर संसार थाटलेल्या गरजूंना मदतीचा हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:03 IST

पेठ - गाव घराच्या ओढीने शेकडो किलोमीटर मुलाबाळासह पायपीट करूनही कोरोनाच्या भितीने गावात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी मजूरांना अखेर गावाबाहेरच्या ऊघड्यावर आपला संसार थाटावा लागला. मात्र सोबतचा शिधा व पैसेही संपलेल्या या गरजू कुंटूंबांना यशोदिप सामाजिक संस्थेने जीवनावश्यक साहित्य पोहच करून मदतीचा हात पुढे केला.

पेठ - गाव घराच्या ओढीने शेकडो किलोमीटर मुलाबाळासह पायपीट करूनही कोरोनाच्या भितीने गावात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी मजूरांना अखेर गावाबाहेरच्या ऊघड्यावर आपला संसार थाटावा लागला. मात्र सोबतचा शिधा व पैसेही संपलेल्या या गरजू कुंटूंबांना यशोदिप सामाजिक संस्थेने जीवनावश्यक साहित्य पोहच करून मदतीचा हात पुढे केला.आदिवासी भागातून रोजगारानिमित्त पर जिल्हयात स्थलांतरीत झालेले शेतमजूर कोरोनामुळे गावाकडे परतत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेकडो मैल पायपीट करत मजूर गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बाहेरून येणाऱ्या लोकांमूळे गावात कोरोनाचा शिरकाव होईल या भितीने अनेक गावांमध्ये अशा मजूरांना प्रवेश नाकारला जात असल्याची वस्तू स्थिती पहावयास मिळत आहे.कामाचे ठिकाण व गाव दोन्ही पासून दुरावल्याने अनेक कुटूंबांना गावकुसावर ऊघडयावर संसार थाटावा लागत असून वाढत्या लॉक डाऊनमुळे जवळचा शिधा व पैसेही संपत आल्याने अशा कुटूंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पेठ शहरानिजक अशाच प्रकारच्या स्थलांतरीत कुंटूबांची माहीती मिळाल्यानंतर यशोदिपचे अध्यक्ष गिरीश गावीत व सहकार्यांनी या नागरिकांना किराणा साहित्य वाटप केले.----------------------------कविता राऊत यांनी दिला धिरसावरपाडा एक्सप्रेस धावपटू कविता राऊत यांनी पेठ तालुक्यातील फणसपाडा , माळेगाव ,आसदणपाडा या गावात यशोदिपच्या माध्यमातून गरजूंना धान्य वाटप करून नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटाशी सामना करतांना काळजी घ्या असा धीर त्यांनी दिला. आदिवासी कवी देवदत्त चौधरी यांनी कोरोना जनजागृती कविता सादर केल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिल भडांगे , अध्यक्ष गिरीष गावित,इंजि. महेश तुंगार, यशोदिप चे सदस्य गुलाब चौधरी, दिपक हलकंदर ,सुरेश धूम,राजेश भोये, मुरलीधर चौधरी,मनोहर राऊत ,हेमराज मानभाव, हेमंत सातपुते ,नितीन भोये ग्रामसेवक भारती देशमुख, यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक