शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातून पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 16:01 IST

फेऱ्यांचे आयोजन : जीवनावश्यक वस्तूंचा साठा रवाना

ठळक मुद्देदेवळा येथून दहा टन जीवनावश्यक वस्तू व साहित्य घेऊन पहिला ट्रक रवाना करण्यात आला.

नाशिक : कोल्हापूर आणि सांगली शहर व परिसरातील पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरूच असून ठिकठिकाणी मदतफेऱ्यांचे आयोजन करण्यात येऊन जीवनावश्यक वस्तूंचे संकलन केले जात आहे. याशिवाय, काही सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवकही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत.सिध्दी इंटरनॅशनल अकॅडमीसटाणा : येथील बागलाण रोटरी क्लब संचलित इंटरॅक्ट क्लब आॅफ सिद्धी इंटरनॅशनल अ‍ॅकडमीच्यावतीने तालुक्यातीत विविध गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. स्कूलच्या १७ बसेसने इंटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी पक्षा भामरे व कृतांत कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांना भेटी देऊन नागरीकांकडुन पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात आली. यासाठी संस्थापक सरचिटणीस डॉ. प्रसाद सोनवणे, व्यवस्थापकीय संचालक अमर रोहोमारे, प्राचार्य दीपक आव्हाड आदींचे सहकार्य लाभले.  आमदार राहुल आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना वस्तू रु पात मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद मिळून देवळा येथून दहा टन जीवनावश्यक वस्तू व साहित्य घेऊन पहिला ट्रक रवाना करण्यात आला. आमदार राहुल आहेर मित्र मंडळ, स्पोर्ट क्लब, शिव निश्चल सेवाभावी संस्था, केदा नाना मित्र मंडळ, नानू आहेर मित्र मंडळ, मृत्युंजय प्रतिष्ठान व रु द्र युवा प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातून संसारोपयोगी साहित्य, औषधे, किराणा सामान, पाण्याचे बॉटल, अशी वस्तू स्वरूपातील मदत जमा केली होती. जमा करण्यात आलेल्या जीवनावश्यक दहा टन वस्तूंचा पहिला ट्रक आमदार आहेर व केदा आहेर यांच्या हस्ते रवाना करण्यात आला. ग्रामसेवक संघटना सरसावलीदेवळा पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक संघटना यांच्यावतीने एका कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतके किराणा सामान, पीठ, तवा, पातेले, पळी, चमच्या, ताट, असे एकूण शंभर पिशव्यांची मदत गटविकास अधिकारी महेश पाटील, ग्रामसेवक युनियनने अध्यक्ष योगेश पगार व सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते आमदार अहेर व केदा अहेर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली. 

टॅग्स :Nashikनाशिक