लौकी शिरस येथील या वृद्धाश्रमात दहा निराधार वृद्ध आश्रयास आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे मदतीचा ओघ आटल्याने संचालक नवनाथ जऱ्हाड यांची निराधारांच्या उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन येवला तालुका तलाठी संघाच्या वतीने आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंसह किराणा सामानाची मदत करण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांनी या आश्रमातील निराधारांना शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी मंडळ अधिकारी चेतन चंदावर, तलाठी संदीप काकड, विजय भदाणे, कमलेश पाटील, अतुल थूल, आकाश कदम, अश्विनी भोसले, परेश धर्माळे, लक्ष्मण आहेर, बापू मुरकुटे, भाऊसाहेब पिंपळे आदी उपस्थित होते.
कोट...
ज्यांना समाजाने नाकारले, ज्यांच्यात शारीरिक अस्थिव्यंग आहे, जे निराधार आहेत, ज्या कुटुंबांनी या व्यक्तींना रस्त्यावर सोडले आहे, अशा निराधारांना आश्रमाचे संचालक नवनाथ जऱ्हाड हे आधार देत आहेत. त्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
- प्रमोद हिले, तहसीलदार, येवला
फोटो- ३० लौकीशिरसगाव
लौकी शिरस येथील सैंगऋषी वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची मदत सुपूर्द करताना तहसीलदार प्रमोद हिले समवेत तलाठी संघाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे,तलाठी संदीप काकड,अतुल थूल आदी.
===Photopath===
300421\30nsk_31_30042021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० लौकीशिरसगाव लौकीशिरस येथील सैंगऋषी वृद्धाश्रमाला जीवनाश्यक वस्तूंची मदत सुपुर्द करतांना तहसीलदार प्रमोद हिले समवेत तलाठी संघाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे,तलाठी संदीप काकड,अतुल थूल,आदि.