शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

कळवणच्या मजुरांना सोलापुरात मिळाली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:25 IST

मनोज देवरे । लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : देशभरात कोरोनामुळे उद्भवलेली बिकट परिस्थिती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाउन झाल्यामुळे ऊसतोडणीसाठी आपल्या गावापासून परजिल्ह्यात कोसो दूर गेलेल्या मजुरांना लॉकडाउन संपेपर्यंत आहे त्याच ठिकाणी राहावे लागत असल्याने पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे या मजुरांना पुढील काही दिवस पुरेल इतका किराणा व धान्य उपलब्ध झाल्याने मजुरांच्या उदरभरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

कळवण : देशभरात कोरोनामुळे उद्भवलेली बिकट परिस्थिती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाउन झाल्यामुळे ऊसतोडणीसाठी आपल्या गावापासून परजिल्ह्यात कोसो दूर गेलेल्या मजुरांना लॉकडाउन संपेपर्यंत आहे त्याच ठिकाणी राहावे लागत असल्याने पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे या मजुरांना पुढील काही दिवस पुरेल इतका किराणा व धान्य उपलब्ध झाल्याने मजुरांच्या उदरभरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात ऊसतोडणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून कळवण तालुक्यातील ऊसतोडणी मजुरांच्या काही टोळ्या गेल्या आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून हे मजूर त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. लॉकडाउनमुळे ऊसतोडणीही बंद झाल्याने या मजुरांना आपल्या गावी परतणे शक्य झाले नाही. पंढरपूर तालुक्यात सध्या वास्तव्य करत असलेल्या कळवण तालुक्यातील शिरसा भागातील ऊसतोडणी मजुरांमधील रमेश बर्डे या युवकाने फेसबुकवरून स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राकेश हिरे यांचा मोबाइल नंबर घेत व्हॉट्सअ‍ॅपवर एक पत्र पाठवले. हे पत्र हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी बर्डेला फोन करून परिस्थिती जाणून घेऊन कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे यांना सदर परिस्थिती सांगून पंढरपूरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून संबंधित मजुरांना मदत करण्याबाबत सांगावे, अशी विनंती केली.तहसीलदार कापसे यांनी पंढरपूर येथील तहसीलदारांशी संपर्क करून परिस्थिती सांगितली. पंढरपूरच्या तहसीलदारांनी त्वरित तेथील प्रशासकीय यंत्रणेला सूचना करत संबंधित ऊसतोड कामगारांना मदत करण्याच्या सूचना केल्या.-----------------कळवण तालुक्यातील काही ऊसतोड मजूर सोलापूर जिल्ह्यात लॉकडाउनमुळे अडकल्याचे व त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची गरज असल्याची माहिती राकेश हिरे यांनी दिल्यानंतर मी पंढरपूरच्या तहसीलदारांशी संपर्क करून संबंधितांना मदत करण्याची विनंती केली. तेथील तहसीलदार व यंत्रणेने त्या मजुरांना सर्वतोपरी मदत केली आहे.- बी. ए. कापसे, तहसीलदार, कळवण

टॅग्स :Nashikनाशिक