शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मदतीचा हात : आईच्या मारहाणीने गंभीर स्थितीत उपचार नंदिनीचे दायित्व स्वीकारणार मराठा क्रांती मोर्चाचे युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:02 IST

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आईने प्रियकराच्या संगनमताने सुटीवर आलेल्या आपल्या दोन मुलांना जबर मारहाण करून एकाचा बळी घेतला,

ठळक मुद्देतिचे भवितव्य अधांतरी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आईने प्रियकराच्या संगनमताने सुटीवर आलेल्या आपल्या दोन मुलांना जबर मारहाण करून एकाचा बळी घेतला, तर दुसºया मुलीला जबर जखमी केले आहे. त्यातील बालकाचा अंत झाला, परंतु मुलगी बचावली. दहा वर्षांच्या नंदिनीवर उपचार सुरू आहे. परंतु तिचे भवितव्य अधांतरी आहे. याची दखल घेत मराठी क्रांती मोर्चाच्या युवा कार्यकर्त्यांना ही घटना कळताच त्यांनी नंदिनीची भेट घेऊन आधार तर दिलाच शिवाय तिचे दायित्वही स्वीकारले. शरणपूर गावठाण भागातील मिशन मळा भागात भाडेतत्त्वावर राहणाºया सोनाली ऊर्फ सोनूबाई या विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिचा सहा वर्षीय मुलगा नकुल थोरात याला धोपटणीने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली तर दहा वर्षांची मुलगी नंदिनीही जखमी असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार कळताच मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांची भेट घेऊन मुलगी नंदिनीच्या जखमा, उपचार औषधे यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आणि मुलगी नंदिनीच्या उपचारासाठी काही कमी पडता कामा नये. पडल्यास मराठा क्र ांती मोर्चा समन्वयक लागेल ती मदत करतील, असे स्पष्ट केले. नंतर मुलगी नंदिनी ज्या वार्डला उपचारासाठी दाखल आहे त्याठिकाणी जाऊन नंदिनीची भेट दिली व तिलाही आधार दिला. त्याठिकाणी नंदिनीची मावशी उपस्थित होती. तिला आधार देत सर्व मदत आम्ही करू, असे सांगितले. नंदिनीच्या मावशीच्या कुटुंबीयांची स्थिती यथातथाच असून त्यामुळे आई तुरुंगात गेल्याने नंदिनीला कोण सांभाळेल, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र त्यावेळी समन्वयक यांनी मावशीला आधार देत सांगितले की, मुलगी नंदिनी बरी झाल्यानंतर तिची सर्व व्यवस्था ही आम्ही करून देतो, तिचे शिक्षण असो, तिचे हॉस्टेल असो, तिला जे लागेल ते सर्व आम्ही उपलब्ध करून देऊ ही जबाबदारी आम्ही स्वीकारलीआहे, असे सांगण्यात आले.यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक तुषार जगताप, सचिन पवार, किरण पाणकर, योगेश कापसे, शरद लभडे, दीपक दहिकर, सुरेश सोळंकी, नीलेश गायके, सागर पवार, करण टिळे, रवींद्र बोचरे, गौरव शितोळे आदी उपस्थित होते.