पेठ : कोरोनामुळे ग्रामीण भागातील पालकांच्या हाताला काम नसल्याने आर्थिक गणिते बिघडली असताना नाशिकच्या ग्रिन केअर या संस्थेने पेठ तालुक्यातील गांगोडबारी या गावातील गरजू पालकांना मदत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
संस्थेच्या पौर्णिमा आठवले, प्राचार्य स्वाती गाडगीळ, अवनी गाडगीळ आदींनी गांगोडबारी गावाला भेट देऊन विद्यार्थी व पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील गरजू पालकांना किराणा साहित्य, मुलांना खाऊ तर शाळेच्या आवारात विविध फुलझाडांचे रोपण करण्यात आले.
ग्रिन केअर संस्थेच्या आठवले यांनी मुलांशी हितगुज केले. कोरोनाकाळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. यापुढेही शाळेसाठी विविध स्वरुपात मदत करण्याचे त्यांनी आश्वासित केले. तसेच ग्रामस्थांनी केलेले सहकार्य व शाळेविषयी असणारी आस्था व उत्साह याचे कौतुक केले.
याप्रसंगी विनर ग्रुपचे सलीम शेख, धर्मराज मोरे, राहुल साबळे, कुंदन जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर दळवी, माता पालक संघ अध्यक्ष संगीता बागुल यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------
गांगोडबारी येथे किराणा साहित्य वाटपप्रसंगी ग्रिन केअर संस्थेच्या अध्यक्ष पौर्णिमा आठवले, स्वाती गाडगीळ, अवनी गाडगीळ, सलीम शेख, धर्मराज मोरे आदी. (२१ पेठ २)
210721\21nsk_12_21072021_13.jpg
२१ पेठ २