राजापूर : राजापूरला बोअरवेल व विहिरींचे पाणी आटल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.लोहशिंगवे शिवारातून राजापूर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो; मात्र विहीर बोअरवेलचे पाणी आटल्याने पंधरा दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यापूर्वी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होत होता. गाव परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे, पाणी कुठे मिळेल का? या शोधात महिला, पुरुष मंडळी दिसत आहे. गावची पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कुचकामी ठरली आहे.लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना पाण्यात जाणार आहे. ग्रामपंचायत भरपूर प्रयत्न करते; मात्र यश येत नाही, सत्ता कोणत्याही गटाची असो पाण्याची वनवण असतेच. त्यामुळे महिला व ग्रामस्थ नाराज राहतात. कायमस्वरूपी पाणीपुरवठा नसल्याने महिलावर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावचा कितीही विकास करा; मात्र उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी राहत नाही. ही तर खेदाची बाब आहे. गावासाठी वडपाटी पाझर तलावातून पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पाणी नसल्याने रोजचे पाणी विकत घेऊन व आंघोळ व धुणे भांड्यासाठी खासगी टँकरवाल्याकडून पाणी विकत घेताना दिसत आहे. आजपर्यंत या पाणीपुरवठा योजनेवर लाखो रुपये खर्च झालेल्या दिसत आहे; मात्र गावाला पाणी नाही ही शोकांतिका आहे. पाण्याअभावी नोकरदार वर्ग तालुक्याच्या ठिकाणी निघून गेले आहे. टँकर सुरू करण्यासाठी आता महिला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र सध्या दिसत आहे.
राजापूरला भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:15 IST
राजापूर : राजापूरला बोअरवेल व विहिरींचे पाणी आटल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
राजापूरला भीषण पाणीटंचाई
ठळक मुद्देटँकरची मागणी : महिलांची भटकंतीटँकर सुरू करण्यासाठी आता महिला रस्त्यावर