शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:06 IST

येवला/सिन्नर : गत पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात खरीप पिके पावसाअभावी सुकू लागली होती. सोयाबीन पिकाची दुबार पेरणीनंतर पावसाअभावी उगवण झालीच नाही. मका, बाजरी, मूग, कांद्याची रोपे पावसाअभावी सुकू लागली होती. गत तीन-चार दिवसांपासून पाऊस सातत्याने हुलकावणी देत होता.

येवला/सिन्नर : गत पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळालेआहे. परिसरात खरीप पिके पावसाअभावी सुकू लागली होती. सोयाबीन पिकाची दुबार पेरणीनंतर पावसाअभावी उगवण झालीच नाही. मका, बाजरी, मूग, कांद्याची रोपे पावसाअभावी सुकू लागली होती. गत तीन-चार दिवसांपासून पाऊस सातत्याने हुलकावणी देत होता. मात्र गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुमारे तासभर परिसरातील सर्वच गावांमध्ये जोरदार हजेरी लावली. पावसामुळे खडकी नाल्यास पूर आला असून, गावालगतच्या शेतातून वाहणाऱ्या पाण्यामुळे गोई नदीवरील शिवकालीन साठवण बंधारा भरला आहे. दरम्यान, नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शेतातील वाहणाºया पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. सातत्याने पावसाळ्यात उद्भवणाºया या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षच असल्याने वाहनधारकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.-----------------टमाटा, मका, सोयाबीन पिकांत साचले पाणीमानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात गुरु वारी (दि. २३) रात्री ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने वाढत्या उष्णतेमुळे मका, सोयाबीन पिके सुकू लागली होती. या मुसळधार पावसाने रस्त्याच्या कडेच्या नाल्या पाण्याने वाहू लागल्या होत्या. गावाजवळ असलेला नाला मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असताना नाल्यालगत असलेल्या शेतकºयांच्या शेतात पाणीच पाणी वाहताना दिसत होते.मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात गुरु वारी (दि. २३) रात्री ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने वाढत्या उष्णतेमुळे मका, सोयाबीन पिके सुकू लागली होती. या मुसळधार पावसाने रस्त्याच्या कडेच्या नाल्या पाण्याने वाहू लागल्या होत्या. गावाजवळ असलेला नाला मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असताना नाल्यालगत असलेल्या शेतकºयांच्या शेतात पाणीच पाणी वाहताना दिसत होते.शेतातील मका, सोयाबीन, टमाटा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्याने अनेक शेतकºयांनी कांदा विक्र ीसाठी काढला आहे. त्यासाठी खोललेल्या कांदा चाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे झाकण्यासाठी शेतकºयांची मोठी तारांबळ उडाली तर काहींचा कांदाही या पावसाने भिजला.निºहाळे-फत्तेपूर परिसरातील बंधारे फूल्लनिºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निºहाळे-फत्तेपूर येथे गुरुवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली. निमोण, कºहे भागातील बंधाºयातून आलेल्या पाण्याने परिसरातील सर्व बंधारे ओव्हर फ्लो झाले. गुरुवारी रात्रभर हत्ती नक्षत्राचा पाऊस पडत होता. निमोण, कºहे येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने येथील जुने बंधारे ओव्हर फ्लो होऊन फुटले. ते पाणी सिन्नर तालुक्यात वाहून आले.\पहाटे पहाटे लोंढा नदीला पूर आला. पूरपाण्याच्या आवाजाने काठावरील ग्रामस्थ जागे झाले. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक दिवसांपासून रिकामे असणारे बंधारे तासाभरात फुल्ल होऊन माळवाडी बंधाºयात पाणी पोहोचले. यावर्षी जूनच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, बाजरीसह भाजीपाला व ऊस लागवड केली. मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती़मात्र गत दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. गुरुवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे संपूर्ण शिवार ओलेचिंब होऊन शेतात पाणीच पाणी झाले आहे. नदी, नाले वाहू लागले आहे. शेततळे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी झालेल्या पावसापेक्षा यावर्षी प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.मेशीत पाऊसमेशी : गेल्या दहा दिवसांपासून मेशीसह परिसरात दडी मारून बसलेल्या पावसाने दुपारी तीनं वाजेच्या सुमारास हजेरी लावत खरीप हंगामातील पिकांना जीवदान दिल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत. या वर्षी अगदी जूनच्या आरंभापासूनच पावसाने जोरदार आगमन केले असल्याने खरिपाची पेरणी लवकर आटोपली होती. चांगला पाऊस होत असल्याने पिकेही जोमदार आहेत. पिकांची कुळवणी,निंदणीही आटोपली होती, मात्र गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. म्हणून शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. शुक्र वारी पहाटे चांगला पाऊस झाला़मालेगावी जोरदार पावसामुळे परिसराला तलावाचे स्वरूपमालेगाव : येथील विठ्ठलनगर, मित्रनगर, पुंडलिक नगर, विष्णूनगर, तुळजाई कॉलनी, दौलत नगर, स्वप्नपूर्ती नगर, पार्श्वनाथ नगर आदी भागात गटारी व पावसाच्या पाण्याच्या निचºयाची सोय नसल्याने परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली .यामुळे मनपा प्रशासनविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.सोयगावातील मित्रनगर, पुंडलिक नगर, विठ्ठल नगर, पवन नगर, पार्श्वनाथनगर, विष्णूंनगर आदी भागात गेल्या महीन्याभरापासून पावसाचे पाणी साचले आहे.त्यात शुक्रवारी झालेल्या पावसाने पुन्हा तलावाचे स्वरूप आले आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. हे पाणी निघण्यास जागाच नाही.

टॅग्स :Nashikनाशिक