शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अति पावसाने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:05 IST

खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : पिकांचे सर्वेक्षण नसल्याने शेतकरी मदतीला मुकणार

खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असतांना नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करायला यंत्रणाच उपलब्ध नव्हती त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.खेडलेझुंगे, रूई, कोळगांव, सारोळे थडी, धारणगांव विर व खडक परिसरात दोन वर्षापासुन शेतीतून पुरेसे उत्पादन नसल्याने मुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयणीय झालेली आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला हा भाग दुष्काळाने होरपळत होता. जुलै आॅगस्ट महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. आज परतीचा पाऊस जोरात होत असल्याने शेतात पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोप, टोमॅटो, मका, बाजरी, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नाले, ओढे, पाट, चाºया वाहत आहेत. त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी ही नाले, चाºया, ओढे संबंधित यंत्रणेकडून साफसफाई न झाल्याने त्यातील पाणी शेतातुन वाहत असल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने आणि भर जोमात पीक असतांना पाण्याचा खंड पडल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे.कर्जाचा डोंगर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशातच परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नुकसान झाल्याने शेतकºयांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. परंतु ़निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु होती. निवडणूक पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतलेली असल्याने पिकांचे सर्वेक्षण, पंचनामे करणार कोण असा प्रश्न शेतकर्यांना पडला होता. निवडणुकीच्या कामामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. शासनाने दिपावलीच्या सुट्टीमध्ये शासकीय यंत्रणेला नुकसान ग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देवुन लवकरात लवकर पंचनामे करु न मदत मिळवुन द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक