शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांद्याची प्रचंड आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 18:26 IST

उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची प्रचंड आवक झाली असुन रास्ता रोको आंदोलनानंतर बाजार भावात काही अंशी सुधारणा झाली आहे. लाल कांद्यास आज सर्वोच्च ९०० रु पये भाव मिळाला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च दर ९०० रु पये : बाजारभावात काही अंशी सुधारणा

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची प्रचंड आवक झाली असुन रास्ता रोको आंदोलनानंतर बाजार भावात काही अंशी सुधारणा झाली आहे. लाल कांद्यास आज सर्वोच्च ९०० रु पये भाव मिळाला आहे. चालु आठवड्यात येथील बाजार समतिीत लाल कांद्याची प्रचंड आवक झाली आहे. आठवड्याच्या सुरूवातीस दोन दिवस लाल कांद्याचे बाजारभाव ९०० रूपयांपर्यंत होते. परंतु बुधवार (दि. २) रोजी सकाळच्या सत्रात लाल कांद्याच्या दरात तब्बल ३०० रूपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत रास्ता रोको आंदोलन छेडले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात बाजारभावात १०० रूपयांची वाढ होत. ७५० रूपयांपर्यंत पोहचले होते. गुरूवारीही बाजारभाव ८०० रूपयांपर्यंत होते. परंतु आज शुक्रवारी आवक वाढुनही बाजारभावात पुन्हा १०० रूपयांची वाढ होत ९०० रूपयांपर्यंत लाल कांदा विक्री झाला. बाजारआवारात 850 वाहनांतुन सुमारे 16 ते 17 हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव कमीत कमी 351 रु पये, जास्तीत जास्त 900 रु पये तर सरासरी 650 रु पयांपर्यंत होते.उन्हाळी कांद्यांच्या दरात पुन्हा 100 रु पयांची घसरण ; सर्वोच्च दर 281 रु पये - लाल कांद्याची आवक कमी होईल व उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेपोटी तब्बल दहा मिहन्यांपासुन चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची बिकट अवस्था झाली असुन वातावरणात बदल झाल्याने चाळीतील कांद्यांना कोमटे फुटल्याने बाजारात निम्मीच कांदा विक्र ीसाठी आणला जात असुन त्यालाही कवडीमोल भाव मिळत आहे.कालच्या बाजारात या कांद्याला सर्वोच्च 391 रु पये भाव मिळाला होता.परंतु आज पुन्हा 100 रु पयांची घसरण होत 281 रु पये सर्वोच्च भाव मिळाला . तर कमीतकमी 50 रु पये व सरासरी 120 रु पये असा भाव होता.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदा