शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर परिसरात उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:16 IST

येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका बसायला सुरुवात होत असल्याने दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका बसायला सुरुवात होत असल्याने दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.ग्रामीण भागात जनावरांना झाडांच्या सावलीत बांधावे लागते आहे. राजापूर व परिसरात उष्णतेची लाट आहे. त्यात लग्नसराई सुरू असल्याने नागरिक उन्हामुळे बऱ्याच लग्नाला जाणे टाळत आहे. जवळचे असेल तर बस, काळीपिवळी, रिक्षाने जाण्याला पसंती देत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी रसवंतीची दुकाने थाटली आहेत. यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळत आहे. राजापूर व परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने व उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने गावी जाताना पाणी बाटली व जारच्या पाण्याला नागरिक पसंती देत आहे. वाºयाचा वेगही कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांनाही उष्म्याची झळ बसत आहे. जनावरांना दिवसातून तीनवेळा पाणी पाजावे लागत आहे.या उन्हामुळे दुभत्या गायी दूध कमी देत आहे त्यामुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे. तसेच जनावरांना ताप येणे अशा आजाराचा सामना करावा लागतो आहे. दुपारी दीड ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसते. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.(२९ राजापूर)

टॅग्स :NashikनाशिकSummer Specialसमर स्पेशल