शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयात विचारांची ज्योत प्रज्वलित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:33 IST

बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले.

ठळक मुद्देनिवृत्ती महाराज यांचे प्रतिपादन

नाशिकरोड : बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले.देवळालीगावातील दंड्या मारुती मंदिराच्या हरिनाम सप्ताहातील आर्टिलरी सेंटररोड येथील मनपाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ अमृत महोत्सवात गोतिसे महाराजांनी गेल्या सहा दिवसांत भागवतकथेतील नऊ अध्यायाचे सुंदर व सोप्या शब्दात निरूपण केले. श्रीकृष्णाने गोकुळात केलेली बाललीलांचे वर्णन केले. सकटासूर, त्रुणावर आणि पुतना यांना मोक्षपर भगवंतांचे नामस्मरण, उखळाबरोबर कृष्णाने केलेली लिला, भगवंतांच्या मुखी माती पाहून माता यशोदेला झालेले विश्वरूप दर्शन, गोपाळ व गवळणीबरोबर भगवंताने खेळलेले खेळ, भगवंतांनी कल्याणवर्धक गोवर्धन करंगळीवर कसा उचलला याबद्दल गोतिसे महाराजांनी कथेचे महात्म्य सांगितले. कथेतील प्रारूप विषयानुसार जिवंत देखावाही सादर केल्याने भाविक, महिला नृत्य करत सहभागी झाले होते.यावेळी स्वागताध्यक्ष बबनराव घोलप, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, रामनाथ महाराज शिलापूरकर, शशीकला घोलप, शंकरशेठ औशीकर, यशवंत भाबड, सुधाकर जाधव, वासुदेव गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील गाडेकर, त्र्यंबकराव गायकवाड, मुकुंद गायकवाड, मंगेश लांडगे, नीलेश खुळगे, अजय कडभाने, रूपाबाई ढोले आदिंसह भाविक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम