शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांबाबतची सुनावणी आॅक्टोबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:27 IST

शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आता आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुनावणी होणार आहे.

नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आता आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुनावणी होणार आहे.  शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते, मात्र त्यास विविध धार्मिक संस्थांनी विरोध केला होता. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली होती आणि महापालिकेने यापूर्वी उच्च न्यायालयाने बेकायदेशीर बांधकामे हटविण्यापूर्वी जी कार्यपद्धती अनुसरण्यास सांगितले होते त्याचे अनुपालन केले नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेच्या कारवाईस स्थगिती आदेश दिले आहेत. आता त्यावर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.कोठारी यांना नोटीसनगरसेवक प्रियांका माने यांच्या चुलत सासऱ्यांना झालेल्या डेंग्यूच्या प्रकरणात कुचराई केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदोरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. माने यांच्या चुलत सासºयाला डेंग्यू झाल्याची तक्रार करूनही त्याबाबत कार्यवाही झाली नाही. डॉ. कोठारी यांनी डॉ. इंदोरकर यांच्याकडे तक्रार केली खरी; परंतु वाहन नसल्याचे निमित्त करून डॉ. इंदोरकर यांनी जाण्यास टाळाटाळ केली असा ठपका ठेवण्यात आला आहे.दरम्यान, यांसदर्भात महासभेत चर्चा झाल्यानंतर महापौरांनी दोन्ही अधिकाºयांना निलंबित करण्याचे आदेश दिले तसेच त्यासंदर्भात प्रशासनालादेखील ठराव दिला आहे. तथापि, आयुक्तांनी यावर आस्ते कदम भूमिका घेत संबंधिताना नोटिसा बजाविल्या आहेत.आता अधिकारी उपस्थित राहणारमहापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे हे नगरसेवकांना भेट देत नाहीत, अशी तक्रार यापूर्वी होतीच नंतर खाते प्रमुखांविषयीदेखील अशाच प्रकारच्या तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, आता अधिकाºयांनी चार ते पाच या वेळेत मुख्यालयात हजर राहून नगरसेवकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.महापालिकेने ई कनेक्ट अ‍ॅप सक्षम केल्यानंतर नागरिक तेथे तक्रारी करीत असले तरी अनेकजण नगरसेवकांकडे तक्रारी करतात, त्यांच्यादेखील समस्या असतात. त्या सोडविण्यासाठी सुरुवातीला ई कनेक्ट अ‍ॅपवर तक्रारी करण्याचे आदेश देण्यात आल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली होती; परंतु त्यामुळेच आता नगरसेवकांनादेखील अधिकारी विशेषत: खाते प्रमुख वेळ देणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाReligious Placesधार्मिक स्थळे