शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

स्थायीच्या सदस्य नियुक्तीबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 02:28 IST

भाजपचे संख्याबळ दोनने कमी झाल्याने आता स्थायी समितीच्या सदस्यपदी पक्षीय तौलनिक बळानुसार शिवसेनेला लाभ होऊ शकतो. या गेल्या वर्षी दाखल झालेल्या उच्च न्यायालयातील याचिकेवर बुधवारी (दि. १३) अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपचा जीव टांगणीला लागला आहे. 

ठळक मुद्देभाजपच्या अडचणीत वाढ : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

नाशिक : भाजपचे संख्याबळ दोनने कमी झाल्याने आता स्थायी समितीच्या सदस्यपदी पक्षीय तौलनिक बळानुसार शिवसेनेला लाभ होऊ शकतो. या गेल्या वर्षी दाखल झालेल्या उच्च न्यायालयातील याचिकेवर बुधवारी (दि. १३) अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपचा जीव टांगणीला लागला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले होते. मात्र पंचवटीत प्रभाग क्रमांक चारमधील या पक्षाच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. तर त्यापूर्वी भाजपाच्याच नगरसेविका असलेल्या सरोज आहिरे यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार निवडून आल्याने भाजपाचे संख्याबळ आणि त्यामुळे पक्षीय तौलनिक बळ कमी झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे अपूर्णांकातील बळ वाढले असून स्थायी समितीची सोळा सदस्यांची रचना बघितली तर या पक्षाचा एक सदस्य वाढू शकतो. तसे झाल्यास स्थायी समितीत भाजपा आणि विरोधकांचे आठ-आठ असे संख्याबळ होते. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच सुनावणीदरम्यान कोरोनाचे संकट आल्यानंतरदेखील उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले नाही. परंतु निवडणुका घेण्यास संमती दिली. त्यातून भाजपचे गणेश गीते हेच निवडून आले. आता त्यांची कारकीर्द संपत असताना आता पुन्हा या विषयाने उचल घेतली आहे. येत्या बुधवारी (दि. १३) या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात होणाऱ्या  या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.आर्थिक सत्ता अडचणीत येण्याची शक्यताया याचिकेत प्रतिवादी असललेल्या महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि नगरसचिव यांना उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. भाजपचे पक्षीय तौलनिक संख्याबळ घटल्यास स्थायी समितीवरील अखेरच्या वर्षातील सत्ता धोक्यात येेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. काय अडचण आहे?यापूर्वी हा वाद विभागीय आयुक्तांकडे गेला होता. विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी होत असल्याने शिवसेनेने आधी त्यांच्याकडे धाव घेतली हेाती. त्यानंतर महापौर पीठासन अधिकारी असल्याने त्यांच्याकडेदेखील दाद मागितली हेाती. परंतु त्याचे निराकरण न झाल्याने अखेरीस शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि विलास शिंदे यांनी उच्च न्यायालयाच दाद मागितली होती. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCourtन्यायालय