शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा?आज सुनावणी : सर्वाेच्च न्यायालय कायद्याबाबत प्रतिकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:08 IST

नाशिक : अंमलबजावणी संचालनालयाकडून दाखल केले जात असलेले मनी लाँडिंÑग कायद्यान्वये गुन्हे व त्याच्या आधारे चालविल्या जाणाºया खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच काहीशी प्रतिकूलता व्यक्त केल्याने या कायद्यान्वये गेल्या पावणेदोन वर्षांपासून तुरुंगात असलेले महाराष्टÑाचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्यासह देशभरातील ८१ संशयित आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ईडीने युक्तिवादासाठी एक दिवसाची मुदत वाढवून घेतल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा?आज सुनावणी : सर्वाेच्च न्यायालय कायद्याबाबत प्रतिकूल

नाशिक : अंमलबजावणी संचालनालयाकडून दाखल केले जात असलेले मनी लाँडिंÑग कायद्यान्वये गुन्हे व त्याच्या आधारे चालविल्या जाणाºया खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच काहीशी प्रतिकूलता व्यक्त केल्याने या कायद्यान्वये गेल्या पावणेदोन वर्षांपासून तुरुंगात असलेले महाराष्टÑाचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्यासह देशभरातील ८१ संशयित आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ईडीने युक्तिवादासाठी एक दिवसाची मुदत वाढवून घेतल्याचे वृत्त आहे.गेल्या वर्षी मार्च महिन्यात छगन भुजबळ यांना महाराष्टÑ सदन घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती, तेव्हापासून भुजबळ मुंबईच्या आॅर्थररोड कारागृहात आहेत, भुजबळ यांच्या अटकेपूर्वी पुतण्या समीरदेखील याच कायद्यान्वये तुरुंगात आहे.भुजबळ यांच्या वतीने अ‍ॅड. सजल यादव यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर ईडीकडून बाजू मांडली जात असतानाच, दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात प्रिव्हेंशन आॅफ मनी लाँड्रिग अ‍ॅक्टच्या कलम ४५ वर एका प्रकरणात सुनावणी झाली. या कलमात या कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला जामीन मिळू नये, अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमक्या याच तरतुदीवर बोट ठेवत सदरची तरतूद मूळ सिद्धांताविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. या कायद्यान्वये ज्या आरोपींनी यापूर्वी जामिनासाठी अर्ज केला असेल व तो फेटाळला गेला असेल तर ते आरोपी पुन्हा खालच्या कोर्टात या तरतुदीच्या विरोधात जामिनासाठी अर्ज करू शकतात, असा निर्वाळाही दिला आहे.गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावर सुनावणी सुरू असताना अ‍ॅड. सजल यादव यांनी सर्र्वाेच्च न्यायालयाच्या या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले व कलम ४५ मधील तरतूद सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने ईडीच्या वकिलांना या मुद्द्यावर स्पष्टीकरण विचारले असता, त्यांनी युक्तिवादासाठी एक दिवसाची मुदत मागवून घेतली. शुक्रवारी आता त्यावर ईडी काय बाजू मांडते याकडे साºयांचे लक्ष आहे. ईडीने ज्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला, त्यातील काही तरतुदींना आक्षेप घेत भुजबळ यांनी दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून न्यायालयात सहा वेळा त्यावर युक्तिवाद करण्यात आला.