शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीची गरज :  तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:17 IST

नाशिक : निरोगी व दीर्घायुष्यी आरोग्यासाठी चांगली जीवनशैली ही आज अत्यंत आवश्यक बाब बनली असून, प्रत्येकाने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. क. का. वाघ महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी (दि.२७) रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. ते पुढे ...

नाशिक : निरोगी व दीर्घायुष्यी आरोग्यासाठी चांगली जीवनशैली ही आज अत्यंत आवश्यक बाब बनली असून, प्रत्येकाने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. क. का. वाघ महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी (दि.२७) रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. ते पुढे म्हणाले की, आजच्या पिढीने चुकीची जीवनशैली अंगीकारली आहे. जंकफूड, मद्यसेवन, व्यसने, जीवघेणी स्पर्धा आणि त्यातून येणारे ताणतणाव यामुळे हजारो आजार त्यांनी स्वत:हून बोलावून घेतले आहेत. या ताणतणावामुळे मेंदूला पुरेशी विश्रांतीच मिळत नसून जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. या चुकीच्या जीवनशैलीमुळे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व अवयवांना आजार होत आहेत. हॉटेलिंग व त्या मार्गाने होत असलेल्या अतिरेकी घातक पदार्थांच्या सेवनाचे परिणाम कळत असूनही त्याला प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबांना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागू शकते. मुलांच्या व्यसनाधिनतेला खतपाणी घालणाºया किंवा डोळेझाक करणाºया पालकांमुळेच पुढल्या पिढ्या संस्कारापासून वंचित राहत आहेत. याप्रसंगी डॉ. राहुल बावीस्कर, वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, चांगदेव होळकर, डॉ. के. एन. नांदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. क. का. वाघ परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गुरू परमात्मा परेशु’ या स्वागतगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्राचार्य कडवे यांनी प्रास्तविक केले. ज्योती पवार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी वाघ शिक्षणसंस्थेचे कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.संस्काराची शिदोरी पुढल्या पिढीकडे सुपूर्द करावीआपल्या आधीच्या पिढ्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी आपणही पुढल्या पिढीकडे सुपूर्द करायला हवी. तरच चांगल्या आरोग्याचा मंत्र टिकून राहील. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा विचार करून आपल्या आयुष्याची दोरी कमजोर करायची की बळकट करायची याचा निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात डिन पदावर सुमारे आठ वर्षे काम केल्यानंतर चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात काय काय परिणाम होऊ शकतात हे आपण फार जवळून पाहिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Healthआरोग्यHelenहेलन