शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वस्थ भारत यात्रा’  आज नाशिक जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:23 IST

समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सातपूर : समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी ही रॅली नाशिक विभागात प्रवेश करीत असून, रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.  अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने जागतिक अन्न दिवसानिमित्ताने १६ आॅक्टोबरपासून देशाच्या सहा वेगवेगळ्या भागातून सायकल रॅली निघालेल्या आहेत. त्यातील तीन रॅली महाराष्ट्रातून जाणार आहेत. यातील एक रॅली नाशिक विभागातून जात आहे. या रॅलीचे स्वागत मंगळवारी कासारी (नांदगाव) येथे करण्यात येणार आहे. पथनाट्य, लोकनृत्य लेजीम पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ढोलताशांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नाशिक विभागात अहमदनगर, नेवासा, मालेगाव, धुळे व शिरपूर आदी ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वागत केले जाणार आहे. या प्रत्येक ठिकाणी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृतीसोबतच भेसळी संदर्भातील चाचण्याही करून दाखविल्या जाणार आहेत.शाळांमधून अन्न हेच औषध, आरोग्याची गुरुकिल्ली या विषयांवर पोस्टर व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक वयोगटासाठी अन्नपदार्थ व खानपान पद्धतींबाबत मार्गदर्शक पुस्तिका बनविण्यात आली असल्याची माहिती सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने जागतिक अन्न दिवसानिमित्ताने देशाच्या जम्मू-काश्मीर, आगरतला, पोंडीचरी, केरळ, गोवा, रांची आदी सहा वेगवेगळ्या भागांतून रॅली निघालेल्या आहेत. त्यातील केरळ (तिरुवानंतपूरम)ची रॅली महाराष्ट्रातून आणि नाशिक विभागातून जात आहे. ही रॅली नांदगाव (कासारी) येथे मंगळवारी येणार असून, नाशिक विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. बुधवारी मालेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर रोजी ही रॅली नाशिक विभागातून (महाराष्ट्रातून) मध्य प्रदेशात जाणार असल्याने शिरपूरला निरोप दिला जाईल. विविध भागांतून निघालेल्या रॅलीचे २७ रोजी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे.- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागNashikनाशिक