शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यप्रश्नी प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:27 IST

महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी आरोग्य व वैद्यकीय प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. अधिकाºयांकडून कामेच केली जाणार नसतील तर प्रभाग समितीच्या सभा घेतातच कशाला, असा संतप्त सवालही सदस्यांनी उपस्थित केला.

इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी आरोग्य व वैद्यकीय प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. अधिकाºयांकडून कामेच केली जाणार नसतील तर प्रभाग समितीच्या सभा घेतातच कशाला, असा संतप्त सवालही सदस्यांनी उपस्थित केला. पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग ३० मध्ये वडाळागाव येथे मनपाच्या रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. परंतु, अद्यापही सर्वसामान्यांसाठी ते खुले करण्यात आलेले नाही. रुग्णालय कधी सुरू करणार, असा प्रश्न श्याम बडोदे यांनी केला. आरोग्य सभापतींनी आदेशित करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. उद्यानातील वाढत्या गाजर गवताकडेही बडोदे यांनी लक्ष वेधले आणि ठेकेदारांना पोसण्याचे काम बंद करा, असा इशारा प्रशासनाला दिला. प्रत्येक प्रभागच्या सभेत सदस्य नागरिकांच्या समस्या मांडतात. परंतु अधिकारीवर्ग जर कामच करत नसेल तर प्रभाग समित्यांच्या सभांना येऊन काय उपयोग, अशी विचारणा डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. चार्वाक चौकातील राधेय अपार्टमेंटच्या तळघरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असल्याची तक्रारही कुलकर्णी यांनी केली. सदर पाणी काढण्याबाबत मनपाच्या कर्मचाºयांना प्रवेश दिला जात नसल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना कुलकर्णी यांनी केली. शनिमंदिरालगत आणि पेठेनगर रस्त्याजवळ नादुरुस्त वाहने पडून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची तक्रार करण्यात आली. प्रभाग २३ मधील जॉगिंग ट्रॅक शनिमंदिर व वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेले महादेव मंदिर अनधिकृत ठरविण्यात आले आहे. परंतु, सदर मंदिर हे ५० ते ६० वर्षांपूर्वीचे असल्याचे चंद्रकांत खोडे यांनी निदर्शनास आणून दिले. विवेकानंद सभागृहालगत वाढलेले गाजर गवत काढण्याची सूचनाही खोडे यांनी केली.  दरम्यान, विविध विकास कामांच्या २५ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.कुलकर्णींचा बदललेला सूर दीड महिन्यापूर्वी झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना भाजपाच्या नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रशासनातील अधिकारी किती चांगले काम करतात आणि फोन केला की पाच मिनिटांतच हजर होतात, अशी कौतुकाची पावती दिली होती. मात्र, दीड महिन्यांतच कुलकर्णी यांचा प्रशासनाबाबत बदललेला सूर पाहून विरोधी सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रभाग सभेत कुलकर्णी यांनी अधिकाºयांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला होता.