शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठ, विश्वकोश मंडळात करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:23 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी परिचर्या विषयासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देआदान प्रदान : परिचर्या विषयासाठी ज्ञानमंडळ स्थापणार

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी परिचर्या विषयासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले.याप्रसंगी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव, श्यामकांत देवरे, अध्यक्षांचे स्वीय सहायक उमाकांत खामकर, समन्वयक डॉ. सरोज उपासणी, विधि अधिकारी संदीप कुलकणी, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे, विद्याव्यासंगी सहायक संतोष गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कुलगुरु म्हणाले, विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू आहे. विविध विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करून मराठी विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रि या सुरू आहे. याकरिता मराठी विश्वकोश मंडळातर्फे विविध विद्यापीठांसमवेत ज्ञानमंडळाची स्थापना केली आहे. या अनुषंगाने आरोग्य विद्यापीठाच्या सहकार्याने परिचर्या विषयासाठी ज्ञान मंडळाची स्थापना करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात येत आहे.कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानात नवनवीन संशोधनामुळे भर पडली आहे. तसेच नवनीवन विद्याशाखा निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने विश्वकोशातील नोंदी, लेखांचे लेखन, समीक्षण, संपादन त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून करणे आवश्यक आहे. याकरिता विद्यापीठाने पुढाकार घेऊन परिचर्या विषयासाठी ज्ञानमंडळ स्थापन करणेसाठी हा सामंजस्य करार केला आहे. आरोग्य शिक्षणातील परिचर्या विषयातील ज्ञानमंडळासंदर्भात लवकरच विद्यापीठातर्फे बैठका व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेद्वारे संबंधित विषयातील लेखकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आरोग्य विद्यापीठातर्फे परिचर्या विषयाच्या ज्ञानमंडळासाठी डॉ. सरोज उपासनी समन्वयक म्हणून तर विद्यापीठ व मराठी विश्वकोश मंडळ या दरम्यान विविध उपक्र मांसाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे हे संयोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यापिठाशी पहिलाच करारमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत देवरे यांनी सांगितले की, आजपर्यंत राज्यातील ४६ विद्यापीठे, संस्थांसमवेत सामंजस्य करार केले असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत परिचर्या विषयासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करण्यासाठीचा हा पहिलाच करार आहे. विद्यापीठ आणि विविध संस्था यांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणातील विविध महत्त्वाच्या विषयांसाठी ज्ञानमंडळ स्थापन होऊन अद्ययावत ज्ञान सर्वांसमोर येणे आवश्यक आहे. या कराराच्या माध्यमातून विश्वकोश खंड अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त राहील.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ