शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन स्ट्रेन नसल्याबाबत आरोग्य यंत्रणा ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:26 IST

 दोन आठवड्यांपासून कोरोनाचा प्रसार खूप वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनसह युरोपातील पाच देशांमधील स्ट्रेन आढळून आल्याच्या चर्चेला अखेर मुख्यमंत्र्यांच्या विधानाने पूर्णविराम मिळाला आहे.  आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांनीच कोणत्याही नमुन्यात भिन्न स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट केल्याने आरोग्य यंत्रणादेखील दुसऱ्या देशांचे स्ट्रेन नसल्याबाबत ठाम आहे. 

नाशिक  :  दोन आठवड्यांपासून कोरोनाचा प्रसार खूप वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनसह युरोपातील पाच देशांमधील स्ट्रेन आढळून आल्याच्या चर्चेला अखेर मुख्यमंत्र्यांच्या विधानाने पूर्णविराम मिळाला आहे.  आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांनीच कोणत्याही नमुन्यात भिन्न स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट केल्याने आरोग्य यंत्रणादेखील दुसऱ्या देशांचे स्ट्रेन नसल्याबाबत ठाम आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा वेग वाढू लागला आणि त्यात गत आठवड्यापासून दुप्पट तर तीन दिवसांपासून तिप्पट वेग वाढल्याने कोरोना प्रसाराच्या या वेगामागे काही वेगळे कारण असेल का, अशा चर्चेला बहर आला होता. विशेषत्वे लागोपाठ दोन दिवस दोन हजारांहून अधिक बाधित आढळल्याने तर कोरोना प्रसारामागील कारणाच्या चर्चेलाच अधिक बहर आला होता. त्यामुळेच राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे काही संशयित नमुने पाठवून त्यांच्या आलेल्या अहवालातून ३० टक्के नमुन्यांबाबत संदिग्धता व्यक्त करण्यात आली होती. दुबई ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनप्रमाणेच त्याचे स्वरूप असल्याचे संकेत देण्यात आले होते. आरोग्य विभागाने स्ट्रेन नसल्याच्या मतावर शिक्कामोर्तब केले.वेगवान वाढीमागील कारणाबाबत संदिग्धतानवीन स्ट्रेन नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला असला तरी अचानकपणे आठवडा-दीड आठवड्यात १५ हजारांहून अधिक नवीन बाधित आढळण्याचे कारण काय, असा सवाल त्यानिमित्ताने चर्चिला जाऊ लागला आहे. रुग्णसंख्या वाढीमागे केवळ गर्दी आणि नागरिकांची बेफिकिरी एवढेच कारण असेल तर नागरिक कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्यावर गत नाेव्हेंबरपासून अशाच प्रकारे वावरत आहेत. त्यामुळे मग अचानकपणे मार्च महिन्यातच वाढ होण्याचे कारण उलगडत नसल्याने आरोग्य यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या