येवला : तालुक्यातील पारेगाव येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात जंतुनाशक औषधाची फवारणी केली आहे, तर गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.पारेगाव येथील ५४ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामपंचायतीने रुग्णाचे वास्तव्य असलेला परिसर सील केला आहे. मुखेड आरोग्य केंद्राच्या पथकाकडून गावातील प्रत्येक नागरिकाची थर्मल गन व आॅक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. याप्रसंगी ग्रामसेवक काकडे, कर्मचारी शिवाजी भोसले, मच्छिंद्र माळी, अंगणवाडीसेविका मनीषा पाठे, आशा पाठे, पोलीसपाटील हरिष गांगुर्डे आदी या मोहिमेस सहकार्य करत आहेत.
पारेगाव येथे आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:57 IST