शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत आठ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 00:03 IST

गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अधिक सतर्कता दाखवत गोविंदनगर परिसरातील प्रत्येक घर पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. बाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत २६ आरोग्य पथकांनी दोन दिवसांत तीन हजार घरांना भेटी दिल्या असून, त्यात ७ हजार ७९० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

ठळक मुद्देगोविंदनगर परिसर : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने युद्धपातळीवर कार्यवाही; प्रत्येक घर पिंजून काढण्यास प्रारंभ

नाशिक : शहरातील गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अधिक सतर्कता दाखवत गोविंदनगर परिसरातील प्रत्येक घर पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे.बाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत २६ आरोग्य पथकांनी दोन दिवसांत तीन हजार घरांना भेटी दिल्या असून, त्यात ७ हजार ७९० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. सुदैवाने आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाचा संसर्ग राज्यात पसरू लागल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांत एकही रुग्ण नाशिकमध्ये आढळला नव्हता, मात्र आठ दिवसांपूर्वी जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातून आणि नंतर गेल्या सोमवारी (दि.६) शहरातील गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. संबंधित बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करताना बाधित रुग्ण राहात असलेल्या घरापासूनचा तीन किलोमीटर परिसरातील भाग सील केला आहे. या परिसरातील जवळपास १० हजार घरांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यासाठी २२ वैद्यकीय पथके कार्यवाही करीत आहेत. याशिवाय चार वैद्यकीय पथकामागे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक निगराणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. या २२ पथकांनी मंगळवारी (दि. ७) १८१० घरांना भेटी देऊन ३८९५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. तर बुधवारी (दि.८) १११० घरांना भेटी देऊन ३८९५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. दोन दिवसांत २९२० घरांना भेटी देऊन ७७९० नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे.एकही संशयित नसल्याने सुटकेचा नि:श्वासमहापालिकेने सुरू केलेल्या तपासणीत परिसरातील नागरिकांनी अलीकडे देश-विदेशात प्रवास केला होता का याची माहिती घेताना घरातील कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का याची तपासणी केली जात आहे. एखाद्या घरातील कोणालाही खोकला, सर्दी किरकोळ आणि सामान्य स्थितीत असल्यास संबंधितांना औषधे दिली जातात, मात्र यापेक्षा काही गंभीर आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले जात आहे. सुदैवाने दोन दिवसांत संशयित रुग्ण न आढळल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य