शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदान कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेविकांनी बजावली सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:36 IST

जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी ओलांडून ४२ ते ४३ अंशांपर्यंत तापमान पोहोचल्याने या कडाक्याच्या उन्हाचा मतदान कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात आली होती.

नाशिक : जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी ओलांडून ४२ ते ४३ अंशांपर्यंत तापमान पोहोचल्याने या कडाक्याच्या उन्हाचा मतदान कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात आली होती.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया सर्व मतदान केंद्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सोमवारी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा पुरविण्याचे तसेच तालुका व इतर ग्रामस्तरीय कर्मचाºयांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक आदी कर्मचारी सकाळपासूनच मतदान केंद्रात उपस्थित होते.प्रत्येक केंद्रात आरोग्य विभागाने स्टॉल लावला होता. यामध्ये विविध प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. उष्माघाताबाबत मतदारांना माहिती देण्यात येत होती. आरोग्य विभागाच्या वतीने अ‍ॅम्ब्युलन्स सेवाही तयार ठेवण्यात आली होती. आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे सकाळपासून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत होते. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिव्यांग मतदारांना आरोग्य कर्मचाºयांनी व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर नेण्यासाठी मदत करण्यात येत होती. 

एका कर्मचाºयाला  किडनी स्टोनचा त्रासमतदान कर्मचाºयांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात आली. संभाव्य उष्माघाताचा त्रास तसेच अन्य दुष्परिणामांमुळे आरोग्यावर होणाºया परिणामांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन औषधो-पचाराची सज्जता ठेवण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील मोहगाव येथील एका बुथवरील कर्मचारी मावळे यांना किडनी स्टोनचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक