नरेंद्र दंडगव्हाळ : सिडकोयेथील प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या प्रभागात सेनेची ताकद वाढली असली तरी गेल्या काही दिवसांपासून सेनेतीलच अंतर्गत गटबाजी उफाळून येत असल्याचे चित्र बघावयास मिळत असल्याने निवडणुकीत सेनेला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याउलट भाजपाची परिस्थिती असून, भाजपात इच्छुकांची संख्या डझनभर असून, यात मागील मनपा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेले असतानाही गुडघ्याला बाशिंग बांधून इच्छुक वरिष्ठांकडे उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक राजेंद्र महाले, पक्षाचे प्रदेश चिटणीस नाना महाले यांचे पुत्र अमोल महाले व शिवसेनेकडून माजी महापौर विनायक पांडे यांचे पुत्र ऋतुराज पांडे व विद्यमान नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचे पुत्र प्रताप चुंभळे, विद्यमान नगरसेवक कल्पना चंभुळे, नाशिक पश्चिम मतदारसंघ प्रमुख प्रवीण तिदमे हे इच्छुक आहे.
सेनेतील अंतर्गत धुसफूस पक्षासाठी ठरतेय डोकेदुखी
By admin | Updated: December 31, 2016 22:47 IST