शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला बॅँक कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावत तो म्हणाला ‘जगण्यासाठी दहा लाख द्या...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 18:42 IST

नाशिक : वेळ: दुपारी दीड वाजेची... ठिकाण: आयडीबीआय बॅँक, एमजीरोड... जीन्स, शर्ट घातलेला व्यक्ती थेट बॅँकेत घुसतो व महिला ...

ठळक मुद्देदूस-या हाताने चाकू काढत गळ्याभोवती लावला'मला जगण्यासाठी १० लाख रुपये पाहिजे'

नाशिक : वेळ: दुपारी दीड वाजेची... ठिकाण: आयडीबीआय बॅँक, एमजीरोड... जीन्स, शर्ट घातलेला व्यक्ती थेट बॅँकेत घुसतो व महिला व्यवथापकाच्या गळ्याभोवती चाकू लावत दुसºया हाताने गळा आवळून धरतो अन् म्हणतो ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये द्या....’ काही वेळेतच बॅँकेत पोलीस दाखल होतात . चाकू लावून पैसे उकळणा-या व्यक्तीला ताब्यात घेतात.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.७) नियमितपणे बॅँका सुरु असताना एमजीरोडवरील बॅँकेत एक पिवळा शर्ट व जीन्स घालेला व तोंडावर मास्क लावलेला व्यक्ती ग्राहक म्हणून येतो. येथील सर्व्हीस आॅपरेशन व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या तृप्ती अग्रवाल (४०,रा.सिरीन मेडोज, गंगापूररोड) यांच्या थेट खुर्चीजवळ येऊन तो व्यक्ती थर्ड पार्टी पेमेंटच्या पध्दतीबाबत विचारु लागला. यावेळी त्यांनी त्यास खूर्चीपासून लांब उभे राहण्यास सांगितले. यानंतर ही व्यक्ती बॅँकेतून निघून गेली; मात्र पुन्हा काही मिनिटांत माघारी फिरली आणि थेट अग्रवाल यांच्या खुर्चीजवळ जात त्यांची मान एका हाताने आवळत दूस-या हाताने चाकू काढत गळ्याभोवती लावला. हा सगळा प्रकार बघून त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करताच बॅँकेतील अन्य सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले असता चाकूधारी व्यक्ती अधिक आक्रमक झाली. यावेळी सेल्स विभागातील भामरे नावाच्या कर्मचा-याने त्या चाकूधारी व्यक्तीसोबत बोलण्यास सुरुवात केली असता तो म्हणाला ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये पाहिजे, पैसे काढून द्या...’ यावेळी सर्व कर्मचारी जोरजोराने अग्रवाल यांना सोडण्याची मागणी करत असतानाही तो चाकूधारी व्यक्ती त्यांची आवळलेली मान सोेडण्यास तयार नव्हता. दरम्यान, बॅँकेचे विभागीय अधिकारी यांनी स्वत: त्याची मागणी पुर्ण करणार असल्याचे सांगितले आणि अग्रवाल यांना सोडून देण्याचा आग्रह धरला. यावेळी त्या चाकूधारी व्यक्तीचा विश्वास बसल्याने त्याने त्यांच्या मानेवर लावलेला चाकू बाजूला करत त्यांना सोडले. यावेळी अन्य पुरुष सहकाऱ्यांनी त्यास विश्वासात घेत पैसे देऊ असे सांगत समजूत काढण्याचा प्रयत्न केला व यावेळी त्याची ओळख जाणून घेतली असता त्याने ‘मला जगायचे आहे, पैसे द्या’ असा तगादा लावत स्वत:चे नाव अमर अशोक बोराडे (रा.तारवालानगर) असे सांगितले. तोपर्यंत बॅँकेत पोलीस दाखल झाले आणि बोराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात चाकूधारी बोराडेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयbankबँकRobberyचोरी