शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ ज्येष्ठ कलावंत साकारतात बोधीपर्णावर बुध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:51 IST

कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार. तथागत गौतम बुद्धांचे एकापेक्षा एक सरस बोलक्या भावमुद्रा या कलाप्रेमीने आपल्या कुंचल्यातून लिलयापणे बोधीपर्णावर साकारल्या आहेत हे विशेष!

ठळक मुद्देमेटालिक, अ‍ॅक्रेलिक रंगाचा वापर पिंपळपानालाच बनविले कॅनव्हास

नाशिक : एखादा छंद जेव्हा मनुष्य जोपासतो तेव्हा त्याच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे; मात्र एकापेक्षा अधिक छंद जोपासत एखादी व्यक्ती जगत असते तेव्हा त्याचे ते जगणे तितकेच समृद्ध असते, याचा प्रत्यय नाशिकमधील उपनगरच्या अरुण जाधव यांची भेट घेतल्यावर सहज येतो.कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार. तथागत गौतम बुद्धांचे एकापेक्षा एक सरस बोलक्या भावमुद्रा या कलाप्रेमीने आपल्या कुंचल्यातून लिलयापणे बोधीपर्णावर साकारल्या आहेत हे विशेष!गांधीनगर मुद्रणालयातून जाधव सेवानिवृत्त झालेले जाधव हे उपनगरमधील दत्तप्रसाद अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी लहानपणीचा मित्र सुरेश सोनवणेकडून कला आणि त्यावर प्रेम कसे करायचे ते शिकले. चित्रकलेचा कुठलाही शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम न शिकता केवळ आवड आणि छंद म्हणून जोपासलेल्या कलेद्वारे जाधव हे एखाद्या कला महाविद्यालयाच्या चित्रकारालाही लाजवेल अशा एकापेक्षा एक सरस चित्राकृती रेखाटतात. त्यांच्या चित्राकृती कॅन्व्हासवर अधिक आकर्षक दिसतातच; मात्र त्यापेक्षाही अधिक सुंदर व लक्षवेधी बोधी वृक्षाच्या पर्णावर (पिंपळपान) दिसतात. भगवान गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा त्यांनी पिंपळपानावर रेखाटल्या आहेत. त्यांनी यासाठी मेटालिक, अ‍ॅक्रेलिक रंगाचा वापर केला आहे, तसेच बुद्धांचे काही चित्र तैलचित्र पक्रारातील आहे.

पिंपळपानालाच बनविले कॅनव्हासजाधव यांनी कॅनव्हासवर कुंचल्याचा आविष्कार दाखविण्यास तितकी पसंती दिली नाही जितकी पिंपळाच्या पानाला दिली. या कलाप्रेमी चित्रकाराने पिंपळाचे पान भिजवून ते वाळल्यावर त्यामध्ये हुबेहूब व्यक्तीचित्र रेखाटण्याची वेगळीच कला शिकली आहे. जाळीदार पिंपळाचे पान हे या कलाकाराचे आवडते कॅनव्हास आहे.यावर चित्र रेखाटण्याचे अद्भुत तंत्र जाधव यांना अनुभवातून आत्मसात झाले आहे. पिंपळपानावर त्यांनी रेखाटलेल्या सर्व चित्राकृती जणू त्या न्याहाळत असलेल्या व्यक्तींशी संवादच साधतात. इतक्या बोलक्या आणि आकर्षक रंगसंगतीची जोड असलेल्या या चित्राकृती जिवंत वाटतात. 

टॅग्स :artकलाNashikनाशिक