शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ रानगवा हरिश्चंद्रगड अभयारण्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:35 IST

शरीराने अजस्त्र मात्र कधी शांत, तर कधी आक्रमक स्वभाव धारण करणारा शाकाहारी वन्यप्राण्यांपैकी एक रानगवा प्रथमच शहराच्या जवळ पाथर्डी शिवारात आढळून आला. पूर्ण वाढ झालेला रानगवा नर हा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातून वाट चुकल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या अभयारण्यात दोन गव्यांचे वास्तव्य अनेकांना आढळून आल्याचे वन्यजीवप्रेमींसह स्थानिक वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिक : शरीराने अजस्त्र मात्र कधी शांत, तर कधी आक्रमक स्वभाव धारण करणारा शाकाहारी वन्यप्राण्यांपैकी एक रानगवा प्रथमच शहराच्या जवळ पाथर्डी शिवारात आढळून आला. पूर्ण वाढ झालेला रानगवा नर हा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातून वाट चुकल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या अभयारण्यात दोन गव्यांचे वास्तव्य अनेकांना आढळून आल्याचे वन्यजीवप्रेमींसह स्थानिक वन अधिकाऱ्यांनी सांगितले.  अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात रानगव्याचे वास्तव्य मागील दोन वर्षांपासून आढळून येत आहे. या अभयारण्यातील राजूर व भंडारदरा वनपरिक्षेत्रातील साम्रद, घाटघर, रतनवाडी आदी गावांमध्ये दोन रानगव्यांची भटकंती अनेकांनी बघितली आहे. पावसाळ्यात रानगवे भंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्याच्या गावांमध्ये दिसून येत होते. त्यानंतर त्यांनी वास्तव्याचे ठिकाण बदलून राजूर वनपरिक्षेत्रातील रंधा गावापासून पुढे स्थलांतर केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. हा प्राणी अत्यंत शक्तिशाली असून, शक्यतो पायी भटकंती करतो; गरज पडल्यास प्रचंड वेगानेदेखील धावू शकतो. पाळापाचोळा, रानगवत खाऊन रानगवा जगतो. वेळेप्रसंगी वाघालाही पिटाळून लावणारा व चारचाकी मोठे वाहनही उलथविण्याची ताकद ठेवणारा गवा हा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वास्तव्यास असल्याची नोंद आहे. या अभयारण्यातून भंडारदरा, इगतपुरीमार्गे सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्यावरून वाट भरकटल्याने रानगवा पाथर्डी शिवारात पोहचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.दोन महिन्यांपूर्वी आंबेवाडीत दर्शननाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधील आंबेवाडी भागातील जंगलाच्या परिसरात नर रानगव्याने दर्शन दिले होते. आंबेवाडीत आठवडाभरापेक्षा अधिक दिवस वास्तव्यास रानगवा होता. इगतपुरीमध्ये दर्शन देणारा गवा पाथर्डीत पोहचल्याची शक्यता इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश डोमसे यांनी वर्तविली.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग