शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:12 IST

गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देगंगाघाटावरील स्थलांतरितांना मदत संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान गंगाघाटावर अनेक बेघर दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या पाल वाहून गेल्याने पुराने भयभीत होऊन कधी झाडाखाली तर कधी भाजीमंडईत सहारा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुराचे पाणी अधिक वाढल्याने उघड्यावर आलेल्या नागरिकांना महापालिका प्रशासनाने तात्पुरते गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठ परिसरात राहणार्या सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका नदीकाठ भागात राहणार्या मोलमजुरी करणार्या नागरिकांना बसला.गाडगे महाराज पुलालगत असलेल्या मरीमाता झोपडपट्टी व अमरधाम नजीक झोपडपट्टीत पुराचे पाणी गेल्याने अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांना सुखरूप पणे गणेश वाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले होते.गंगाघाटावर अनेक बेघर राहत असून दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर अशीच दिनचर्या चालते मात्र रविवारी गोदावरीला आलेल्या पुरानंतर सगळ्यांचीच पळापळ झाली राहायला जागा मिळाली मात्र पोटात अन्नाचा कणही नाही त्यामुळे काय करायचे असा विचार करत असतानाच पंचवटीतील सुनील धुमाळ, मयूर शिंदे, चेतन गरकळ या तिघा तरु णांनी स्वखर्चाने सुमारे 400 ते 500 बेघर झोपडपट्टीत राहणार्या स्थलांतरित नागरिकांना सकाळ सायंकाळ भोजन व्यवस्था करून दिली.रामवाडी परिसरात तळेनगर येथे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांच्या संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभागाच्या नगरसेवक श्रीमती भिकुबाई बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल यांनी सुमारे 300 ते 400 नागरिकांना दुपारी भोजनाची व्यवस्था करत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले.

 

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलgodavariगोदावरी