नाशिक : कंपनीच्या कार्यालयात कामाला असलेल्या नोकरानेच ड्रॉवरमधून ७६ हजार रुपये चोरून नेल्याच्या संशयावरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश आनंदराव पठाडे यांची अनमोल लाइफ केअर अॅण्ड सिक्युलर मार्केटिंग कंपनी असून, तिचे गंगापूररोडवरील सौभाग्यनगरमध्ये कार्यालय आहे़ त्यांच्या कार्यालयात संशयित योगेश अहेर (अशोकनगर, सातपूर) हा कामास आहे़ रविवारी कार्यालयात कोणी नसल्याने संशयित योगेशने टेबलाच्या ड्रॉवरमधील ७६ हजार ७६१ रुपये चोरून नेल्याची फिर्याद पठाडे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ (प्रतिनिधी)
नोकरानेच ७६ हजार रुपये चोरून नेल्या
By admin | Updated: November 19, 2014 01:37 IST