शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कमरेला पिस्तुल अन‌् हातात कोयते घेऊन घरात शिरले अन‌् सहा हजारांची रोकड लुटून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 14:49 IST

महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी जाधव यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती.

ठळक मुद्देभरदिवसा घडला प्रकार, महिलेला मारहाणमहिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

पंचवटी : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांवरील खाकीचा वचक कमी होताना दिसत आहे. भरदिवसा सराईत गुंडांची टोळी कमरेला पिस्तुल अन‌् हातात धारधार कोयते घेत एका घरात शिरली आणि महिलेला शिवीगाळ व मारहाण करत घरातील सहा हजारांची रोकड घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचा वेगाने तपास करत पंचवटी पोलिसांना टोळीला गजाआड करण्यास यश आले.सोमवारी (दि.२६) भरदिवसा फुलेनगर येथील रहिवाशी सोनी संतोष जाधव यांच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी जाधव यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती. यानुसार अज्ञात गुंडांच्या टोळीविरुध्द पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आणि तपासचक्रे वेगाने फिरविली असता संशयित सराईत गुन्हेगार प्रशांत अशोक जाधव, योगेश प्रल्हाद लांबाडे, रोहन प्रभाकर निकम, अंकुश भूषण सोनवणे, मयूर वाघमारे व जतिन दिलीप साळुंखे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सर्व सराईत गुन्हेगारांवरशहरातील विविध पोलिस ठाण्यांत मारहाण, चोरी, जबरी लूट, दरोडे यांसारखे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्नसोमवारी सकाळी सराईत गुंडांनी कमरेला बंदूक लावून व हातात धारदार कोयते घेऊन घरात बळजबरीने प्रवेश करत घरात असलेल्या शांता गुंजाळ, गीता गुंजाळ, मेघा जाधव या महिलांना शिवीगाळ व मारहाण केली तसेच फिर्यादी सोनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जाधव यांनी वार चुकवला असता घरातील आरसा फुटला यावेळी फिर्यादीची मावशी राजश्री गुंजाळ या मदतीसाठी आल्यात या संशयितांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण करून दुचाकीवरून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीArrestअटक