शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेवर ‘आक्रोश मोर्चा’ हॉकर्स-टपरीधारक : एकतर्फी हॉकर्स झोन रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:06 IST

नाशिक : महापालिकेने शहरात रस्त्यांवर व्यवसाय करणाºया विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने महापालिकेवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

ठळक मुद्देएकतर्फी करण्यात आलेले हॉकर्स झोन रद्द करण्याची मागणीमहापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चाचे रूपांतर सभेत

नाशिक : महापालिकेने शहरात रस्त्यांवर व्यवसाय करणाºया विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने महापालिकेवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी, आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात एकतर्फी करण्यात आलेले हॉकर्स झोन रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने भाजपाचे नेते सुनील बागुल, शिवसेनेचे शिवाजी भोर, पिपल्स रिपाइंचे शशिकांत उन्हवणे, भाजपाचे नवनाथ ढगे, सय्यद युनूस, श्रमिक हॉकर्स सेनेचे संदीप जाधव, अजय बागुल व हॉकर्स युनियनच्या पुष्पा वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या राजीव गांधी भवनवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. भालेकर मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने हॉकर्स-टपरीधारक सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कृती समितीच्या नेत्यांची भाषणे झाली. कुठलेही नियोजन न करता हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. मात्र, या हॉकर्स झोनला सर्वांचा तीव्र विरोध आहे. २३ जून २०१७ रोजी महापौरांकडे झालेल्या बैठकीत फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून विभागीय अधिकाºयांनी झोनबाबत विचारविनिमय करावा, असे ठरले असतानाही, एकतर्फी झोन तयार करून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याशिवाय, ‘मुंढे साहेब, गो बॅक...’चे फलकही लक्ष वेधून घेत होते. महापालिकेसमोर झालेल्या जाहीर सभेत वक्त्यांनी मुंढे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपा नेते सुनील बागुल यांनी तिखट शब्दांत आयुक्तांचा समाचार घेतला.