शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:53 IST

अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, त्यात विज्ञान दडलेले असते. तुम्ही वैज्ञानिक दृष्टी ठेवली तर अंधश्रद्धेला बळी पडणार नाही, असा सल्ला प्रा. वसंत सोनवणे यांनी दिला.

ठळक मुद्देवसंत सोनवणे : पाडळी विद्यालयात चव्हाण व्याख्यानमाला

सिन्नर : अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, त्यात विज्ञान दडलेले असते. तुम्ही वैज्ञानिक दृष्टी ठेवली तर अंधश्रद्धेला बळी पडणार नाही, असा सल्ला प्रा. वसंत सोनवणे यांनी दिला.तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्रा. सोनवणे यांनी करणी कशी काढतात त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.आर. के. मुंगसे यांनी रसास्वाद या विषयावर गुंफले. त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांची आज्ञा पाळेल, त्यांचा शब्द ओलांडून मी कोणतेही पाऊल उचलणार नाही, अशी विद्यार्थ्यांना शपथ दिली. दुसरे पुष्प सोनवणे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर गुंफले. त्यांनी व्याख्यानात गुरुत्वाकर्षण, अगरबत्ती फिरविणे, नारळातून करणी काढणे, तोंडातून दोरा काढणे, नाकाने दूध काढणे, होम पेटविणे ही प्रात्यक्षिके करून दाखविली. यामुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीचे आकर्षण वाढले. कुढल्याही अंधश्रद्धेला व भोंदूबाबांना बळी पडू नये असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस.बी. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. बी.आर.चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सी.बी. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सविता देशमुख यांनी आभार मानले.  तिसरे पुष्प आर. डी. शिंदे यांनी कथाकथन या विषयावर गुंफले. त्यांनी एखादी गोष्ट सांगताना ती कशी कथन करावी, एखादी कथा आपल्या शारीरिक देहबोलीभाषेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांतून समजावून सांगितली. कथा सांगताना शरीराचे हावभाव करून विद्यार्थ्यांना गोष्टी पटवून दिल्या. तुम्हीसुद्धा कथाकथन करताना तुमचे कलागुण वापरून कथाचा मथितार्थ समजावून सांगू शकता, असे विद्यार्थ्यांना सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण