शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा, शहर बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:50 IST

महापालिकेकडून कारवाई सुरू : आज सिडको-सातपूर विभागात मोहीम

ठळक मुद्दे विधीवत पूजा करुनच धार्मिक स्थळ हटविले जात आहे प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवारकारंजा,भद्रकाली, शिवाजीरोड परिसरात बंदला संमीश्र प्रतिसाद

नाशिक- नाशिक महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार दुसऱ्या  टप्प्यात आजपासून पुन्हा एकदा अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास प्रारंभ केला आहे. मोहिमेची सुरुवात सिडको विभागातून करण्यात आली असून आतापर्यंत चार धार्मिक स्थळे हटविण्यात आलेली आहेत. पोलिस बंदोबस्तात महापालिकेने कारवाई सुरू केली असून विधीवत पूजा करुनच धार्मिक स्थळ हटविले जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईविरोधात मठ मंदिर बचाव समितीच्यावतीने आज नाशिक बंदची हाक देण्यात आली असून मेनरोडसह शहरातील बाजारपेठ परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद आहे.महापालिकेने सन २००९ पूर्वीची परंतु रस्त्यांवर अडथळा ठरणारी १५० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार, अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला सिडकोतून प्रारंभ करण्यात आला. पोलिस बंदोबस्तात धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही केली जात आहे. महापालिकेमार्फत धार्मिक स्थळे हटविण्यापूर्वी पुरोहितांमार्फत पूजाविधी केला जात असून त्यासाठी खास पुरोहितही नेमण्यात आला आहे. महापालिकेचे ३० कर्मचारी तैनात असून सहाही विभागाचे अधिकारी यांना प्राधिकृत म्हणून नेमण्यात आले आहे. धार्मिक स्थळ हटविल्यानंतर डेब्रीज उचलण्यासाठी बांधकाम विभागाने डम्पर उपलब्ध करुन दिले आहेत. दुपारनंतर सदर मोहीम सातपूर विभागात राबविली जाणार आहे. दरम्यान, मठ मंदिर बचाव समितीच्यावतीने आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार, सकाळी मध्य नाशिक परिसरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवारकारंजा,भद्रकाली, शिवाजीरोड परिसरात बंदला संमीश्र प्रतिसाद आहे. समितीचे कार्यकर्ते व्यापाºयांना आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करताना दिसून येत आहे. बाजारपेठ परिसरात पोलिस गस्तही वाढविण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत सदर कारवाई येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNashikनाशिक