शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हार्वेस्टरचालकांचा वधारलाय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:02 IST

लॉकडाउनचा फायदा घेत ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचालकांना चांगलाच भाव वधारला असून, आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देगहू काढणीच्या दरात वाढ : शेतकऱ्यांची लूट; लॉकडाउनची साधली संधी

कवडदरा : लॉकडाउनचा फायदा घेत ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचालकांना चांगलाच भाव वधारला असून, आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे.सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतीची कामे सुरू झाली आहेत. गहू सोंगणीची कामे जोरात सुरू आहेत. परंतु या लॉकडाउन काळात शेतमजूर मिळेनासे झाले आहेत. त्याचप्रमाणे परराज्यातून दरवर्षाप्रमाणे येणारे हार्वेस्टर मशीन यावर्षी आले नसल्याने, स्थानिक हार्वेस्टरचालकांनी अचानक याचा फायदा घेत गहू काढण्यासाठी प्रत्येक एकराचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे मुळातच आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना हार्वेस्टर मालकांनी भाव वाढवल्यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे. यापूर्वी शेतीची कामे बंद होती; परंतु सरकारने शेतीच्या कामाला लॉकडाउन काळात सवलत दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतातील पिके सोंगणीच्या कामांनी सध्या जोर पकडला आहे. शेतातील उत्पादित धान्य, कांदा, फुले, फळे, बहुतांशी भाजीपाला व इतर शेतीत उत्पादन होणाºया वस्तू, मार्केट बंद असल्यामुळे बाजारात नेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांची आर्थिक कमाई सध्या बंद आहे. परंतु आता शासनाने शेतीच्या कामांना लॉकडाउनमधून वगळण्यात आल्यामुळे, आता शेतकरी शेतकामावर जोर देत आहे.गहू सोंगणीला आल्यामुळे व तो लवकर काढणे गरजेचे असल्यामुळे मात्र नेहमीप्रमाणे लॉकडाउन काळात शेतमजूर मिळत नसल्याने नाइलाजाने हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढला जात आहे. मात्र त्यामुळे या हार्वेस्टरवाल्यांना मोठा भाव आला आहे. त्यांनी या पंधरा-वीस दिवसातच प्रतिएकर पाचशे, सहाशे रुपये भाव अधिक वाढवला आहे. पूर्वी गहू काढण्यासाठी प्रतिएकर पंधराशे ते सोळाशे असा भाव होता; परंतु आता हाच प्रतिएकर भाव दोन हजार रुपये व त्यापुढे गेला आहे. शिवाय हार्वेस्टरवाल्यांना अनेकदा सांगूनही लवकर ते येत नाहीत. आता या हार्वेस्टरवाल्यांकडे नंबर लावण्याची वेळ शेतकºयांना आली आहे. एकप्रकारे अडवणूक होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी