त्र्यंबकेश्वर : नाशिक तालुक्यातील जातेगाव येथे महाराष्टÑ केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हभप गतीर महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.जातेगावच्या हर हर महादेव मित्रमंडळाने या स्वागत सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यांनी सदगीर यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला व गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस घरोघर महिलांनी औक्षण केले. त्यानंतर सत्कार सोहळा झाला. सोहळ्यासाठी आमदार सरोज आहिरे, नाशिक पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, मनपा नगरसेवक हेमलता कांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र केसरी परशुराम पवार, दादा कुकडे, सुनील जाधव, सचिन जाधव, अविनाश कातोरे यांचादेखील सन्मान करण्यात आला.
हर्षवर्धन सदगीर यांचा जातेगावी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:43 IST