शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बद्रीनाथ येथे दुमदुमणार हरिनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 18:46 IST

सप्ताहाचे आयोजन : मुंढेगावच्या गतीर परिवाराचा उपक्र

ठळक मुद्देधनंजय महाराज गतिर, भरत महाराज गतीर यांच्यासह कुटुंबातील सर्व सातही बंधु वारकरी संप्रदायात अग्रेसर आहेत.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील वारकरी संप्रदायातील गतीर परिवाराने चारधाम पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र बद्रीनाथ याठिकाणी साडेतीन दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असून या सप्ताहासाठी सहभागी होणारे सर्व भाविक हे विमानाने गुरु वारी (दि.२७) प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांची ही विमानवारी पंचक्रोशीत कुतुहलाचा विषय बनली असून बद्रीनाथ स्थळी हरिनामाचा गजर दुमदुमणार आहे.इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार धनंजय महाराज गतीर, भरत महाराज गतिर यांच्या परिवारातील अनेक उपक्र म प्रेरणादायी असतात. यावेळी या परिवाराने दोन धाम यात्रा आयोजित केली आहे. यापैकी बद्रीनाथ धाम येथे अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी या सप्ताहास प्रारंभ होणार असून ३ आॅक्टोबर रोजी सांगता होणार आहे. या उपक्र मात दररोज पहाटे गरम पाणी कुंडस्नान, काकडा भजन,सकाळ-सायंकाळ कीर्तने, दुपारी बद्रीनाथ परिसर दर्शन, हरीपाठ असा दिनक्र म असणार आहे. या सोहळयासाठी जवळपास १०० भाविक, वारकरी सहभागी होणार असुन सर्वजण मुंबई ते दिल्ली असा जाण्याचा व परतीचा प्रवास विमानाने करणार आहेत.विविध उपक्रमधनंजय महाराज गतिर, भरत महाराज गतीर यांच्यासह कुटुंबातील सर्व सातही बंधु वारकरी संप्रदायात अग्रेसर आहेत. कीर्तनकार, प्रवचनकार, ढोलकी वादक, आदिच्या माध्यमातून ते सेवा देत आले आहेत. मुंढेगाव येथे दरवर्षी महिनाभराचा सप्ताह, मुंढेगाव ते पंढरपुर वारी, संतांच्या नावाने विविध उपक्र म, आदि उपक्रम ते राबवित असतात.

टॅग्स :Nashikनाशिक