नाशिक : हिंदू धर्मीय महिलांचे राहणीमान, आचरण हे परंपरेला अनुसरूनच असायला हवे. तसेच आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. ‘हिंदू धर्म, संस्कार व संस्कृती’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. हरिहर भेट महोत्सव सांगतेच्या निमित्ताने हे व्याख्यान सुंदरनारायण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण यावेळी महापौर अशोक मुर्तडक, नवनिर्वाचित आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. या मंडळाच्या वतीने हरिहर भेट महोत्सवात जादूचे प्रयोग, भारुड, पोवाडे, भजने यांसारख्या अनेक धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याची सांगता शुक्रवारी अमोल पाळेकर प्रस्तुत ‘स्वाद स्वरांची’ या हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमांनी झाली. तसेच शनिवारी (दि. ८) दुपारी १२ ते ४ दरम्यान महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. यावेळी भाविक उपस्थित होते.
हरिहर भेट महोत्सवाची उत्साहात सांगता
By admin | Updated: November 8, 2014 00:59 IST