शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

हर हर महादेव... जय भोले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:50 IST

हर हर महादेव... जय भोले... बम बम भोलेचा गजर करत हजारो भाविकांनी शहरातील महादेवाच्या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्र सर्वत्र साजरी झाली.

नाशिक : हर हर महादेव... जय भोले... बम बम भोलेचा गजर करत हजारो भाविकांनी शहरातील महादेवाच्या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्र सर्वत्र साजरी झाली. विशेष म्हणजे यंदा महाशिवरात्र भगवान शंकराचा वार असलेल्या सोमवारी (दि.४) आल्याने ही पर्वणी साधत मोठ्या प्रमाणावर अभिषेक करण्यात आले.दरम्यान, प्रयागराज कुंभमेळ्याची आज शेवटची पर्वणी असल्याने जे भाविक प्रयागराजला जाऊ शकले नाहीत त्यांनी दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीत पवित्र स्नान केले. गोदावरीला पाणी सोडलेले असल्याने राज्यभरातून तसेच परराज्यातून आलेल्या भाविकांची रामकुंडावर गर्दी झाली होती.माघ कृष्ण चतुर्दशीला साजरी होणारी शिवरात्र धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जाते. या रात्रीला महाशिवरात्र नावाने संबोधले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. यादिवशी कुटुंबातील सर्वच जण उपवास करतात. भगवान शंकराचे स्मरण करीत महादेव मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर बेलपुष्प अर्पण करून दुधाचा अभिषेक भाविकांकडून केला गेला. भगवान शिवशंकराची आराधना करीत महाशिवरात्रीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.५) सांगता शिवभक्तांकडून केली जाणार आहे. उत्तर भारतात महाशिवरात्र फाल्गून महिन्यात साजरी होते.पृथ्वीच्या निर्मितीप्रसंगी भगवान शंकरांनी याच तिथीला मध्यरात्री रौद्ररूप धारण केले होते, अशी मान्यता आहे.भाविकांची दर्शनासाठी रीघसोमेश्वर मंदिरात महाशिवरात्रनिमित्त सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. मंदिरात विश्वस्त मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पंचवटी मानेनगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्ताने ओंकारेश्वर मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. तपोवनात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महारुद्र अनुष्ठान सोहळा सुरू होता.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीNashikनाशिक