शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बालकांसाठी दिवाळीच्या सुटीत वाचन पर्वणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:03 IST

यंदाच्या वर्षापासून नाशिकमधील बालकांना खऱ्या अर्थाने पुस्तकांच्या खजिन्यात मनसोक्त रमण्याचा आनंद घेता येणार आहे.

नाशिक : यंदाच्या वर्षापासून नाशिकमधील बालकांना खऱ्या अर्थाने पुस्तकांच्या खजिन्यात मनसोक्त रमण्याचा आनंद घेता येणार आहे. या पुस्तक खजिन्यातील ७ हजाराहून अधिक गोष्टी आणि मनोरंजक कथासंग्रहांसह बालसाहित्य वाचनाचा आनंद बालकांना मोफत लुटता येणार आहे. त्याशिवाय यंदाच्या वर्षी नाताळच्या सुट्ट्यांमध्ये सावानाच्या वतीने प्रथमच सावाना बालसाहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने यंदाच्या वर्षापासून वाचनप्रिय बालकांच्या सुट्ट्या खºया अर्थाने रंगणार आहेत.नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच बालकांमध्ये वाचनचळवळ रुजवण्यासाठी त्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सावानाच्या बाल विभागातील तब्बल ७ हजार पुस्तके आता मुलांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे सहामाही परीक्षेनंतर सुरु झालेल्या यंदाच्या दिवाळी सुट्टीपासून बालकांसाठी पुस्तकांचा उत्सव रंगणार आहे. सावानामध्ये स्वतंत्र दालन करण्यात आलेल्या बालविभागात बालवाचकांना त्यांना हवे ते पुस्तक त्यांच्या हाताने घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तिथेच वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याने तिथे बसून किंवा घरी नेऊनदेखील पुस्तके वाचता येणार आहेत. त्याशिवाय या बालविभागात दोन संगणकांचीदेखील व्यवस्था करण्यात येणार असल्याने ज्या मुलांना आॅनलाईन पुस्तके वाचायची असतील, त्यांच्यासाठी ती सोयदेखील उपलब्ध राहणार आहे. बालकांना केवळ वाचनालयात आणणे इतकेच कर्तव्य पालकांना पार पाडावे लागणार आहे.नोंदणीसाठी आवाहनबालसाहित्यिक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या स्वरचित कथा, कवितांच्या सादरीकरणातून उद्याच्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यासाठी राज्यभरातील पालकांनी त्यांच्या बालकांची नावनोंदणी ५ नोव्हेंबरपर्यंत करावी, असे आवाहन सावानातर्फे करण्यात आले आहे. त्यातील सहभागासाठी ५ ते २० वर्ष अशी वयोगटाची अट आहे.पहिला बाल साहित्यिक मेळावा वर्षअखेरीससावानाच्या वतीने दरवर्षी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्या प्रथेला आता ५२ वर्ष पूर्ण झाल्यानंतर यंदाच्या वर्षापासून बाल साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्धारदेखील सावानाने केला आहे. त्यानुसार येत्या डिसेंबरअखेरीस पहिल्या बालसाहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या बालविभागातील पुस्तके मोफत उपलब्ध करुन दिल्यामुळे बालविश्वातील वाचन चळवळीला चालना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. भविष्यातील बालसाहित्यिक घडवण्यासाठी बाल साहित्य मेळावा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक बालकांनी नाशिक सावानाशी संपर्क साधावा.- संजय करंजकर,बालविभाग प्रमुख ,सावाना

टॅग्स :literatureसाहित्यStudentविद्यार्थीlibraryवाचनालय