शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाच्या भरात उमेदवारी अर्जावर सही करायलाच विसरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:50 IST

महापौर म्हणा अथवा उपमहापौर म्हणा मानाच्या या पदावर संधी मिळणे हे अनेकांना भाग्याचेच वाटते. महापालिकेत घडामोडी सुरू असताना त्याचा प्रत्यय आला. कोणी उमेदवारी दाखल करताना सहीच विसरून गेले तर कोणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आल्यानंतर त्यांना चरण स्पर्श करू लागले

नाशिक : महापौर म्हणा अथवा उपमहापौर म्हणा मानाच्या या पदावर संधी मिळणे हे अनेकांना भाग्याचेच वाटते. महापालिकेत घडामोडी सुरू असताना त्याचा प्रत्यय आला. कोणी उमेदवारी दाखल करताना सहीच विसरून गेले तर कोणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आल्यानंतर त्यांना चरण स्पर्श करू लागले. या सर्व भानगडीत अनेक संभाव्य फुटीर हे मात्र प्रकृती ठीक नसल्याच्या करणावरून मेडिकल लिव्हवर असल्याचे सांगितले जात होते.महापौरपदाच्या निवडणुकीमुळे बुधवारी (दि.२०) महापालिकेचे राजीव गांधी भवन गजबजले होते. पक्षाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच ताबा घेतला होता. पक्षाच्या वतीने कोणाला उमेदवारी दाखल करण्यास सांगितल्यानंतर गटनेते तसे स्पष्ट करीत आणि नंतर इच्छुकांचे अर्ज दाखल करण्यास लगबग सुरू होत. भाजपच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार यांना उपमहापौरपदासाठी संभाव्य उमेदवार घोषित केल्यानंतर ते अर्ज दाखल करण्यास पदाधिकाऱ्यांसमवेत आले. त्यांनी अर्जदेखील भरला. माध्यमांचे कॅमरे लकाकले आणि नंतर पुन्हा अर्ज तपासला तर त्यावर त्यांची सहीच नव्हती.भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनीही त्यांना काय हे अर्ज दाखल करताना साधी सहीदेखील केली नाही का अशी विचारणा केली. त्यानंतर पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्याचा रिटेक झाला आणि मग अर्ज दाखल झाले.महापालिकेच्या या गर्दीत अनेक संभाव्य फुटीर हजर नव्हते. त्यांच्याबाबत विचारणा केल्यानंतर ते आजारी आहेत असे सांगितले जात त्यामुळे राजकीय आजार असलेले हे नगरसेवक मेडिकल लिव्हवर असल्याचे सांगितले जात. या गडबडीत महापौर मात्र खरोखरीच आजारी पडल्या. त्यांना एका खासगी इस्पितळात तपासणी आणि उपचारासाठी जावे लागल्याने त्या अनुपस्थित होत्या. भाजपकडील गैरहजर नेत्यांच्या यादीत दोन आमदार, माजी शहराध्यक्ष, प्रदेश चिटणीस असे अनेक जण नव्हते.बोलावणे आल्याशिवाय नाही !महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक आघाडीवर ज्यांचे नाव चर्चेत होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे नाराज होऊन ते महापालिकेत आले नाही. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्याला पक्षाने साधा अर्ज भरण्यासदेखील सांगितले नाही की, कोणी अन्य अर्ज दाखल करणाºयाने ज्येष्ठत्वाच्या नात्याने बोलावले नाही. मग कशासाठी यायचे असे सांगत बोलावणे आल्याशिवाय नाही या दिवाकरांच्या नाट्यछटेची आठवण करून दिली.शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी एकत्र अर्ज दाखल केले. मात्र त्याचे छायाचित्र मात्र वेगवेगळे काढण्यात आले. तोच अर्ज दुसºया उमेदवाराच्या हातात देऊन छायाचित्रासाठी पोझ देण्यात येत होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूक