कळवण : कळवणची पंचवटी समजल्या जाणाऱ्या गांधी चौकात श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमनिमित्ताने शहरात सलग आठ दिवस सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्र मांची रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होऊन श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संत सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे मठाधीपती प्रसाद महाराज यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यकम झाला. श्री श्री १००८ महंत इंद्रदेव महाराज यांचा श्रीराम कथेचा कार्यक्रम झाला. समारोपानिमित्त हजारो हनुमानभक्तांनी पुरणपोळी , रस या महाप्रसादाचा लाभ घेतला. पेशवेकालीन कलाकृतीचे भारतातीतील एकमेव या मंदिरात प्रचंड उत्साहात श्री हनुमान, श्री महादेव, श्री गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मान्यवर संतांच्या व महंतांच्या उपस्थितीत करण्यात आली.राज्यस्थानमधील जयपूर येथून आणलेल्या श्री हनुमान मूर्तीची नगराध्यक्ष सुनीता पगार ,गटनेते कौतिक पगार, मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सुनील महाजन, उपनगराध्यक्ष अनिता महाजन ,व मान्यवरांच्या हस्ते कळवण शहरातील पुरोहित बांधवांनी मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात येऊन मिरवणुकी काढण्यात आली. पानसुपारी ,मांडव मिरवणूक ,श्री गणेशयाग ,महारु द्र याग आदी विविध धार्मिक कार्यक्र म करण्यात आले ,श्री हनुमान मंदिराच्या दीपस्तंभ प्रज्वलन श्री श्री १००८ स्वामी सोमेश्वरनंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. मथुरा येथील श्री श्री १००८ इंद्रदेवजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून गांधी चौकात श्री राम कथा सप्ताह संपन्न झाला. गेल्या गुरु वारी संत सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे मठाधिपती हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते कलश रोहन व श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्र म संपन्न झाला. यावेळी श्री श्री १००८ इंद्रदेव महाराज, श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष नंदकुमार खैरनार, मुरलीधर पगार, कौतिक पगार, सुधाकर पगार, परशुराम पगार, निंबा कोठावदे, संजय मालपुरे, सुनील शिरोरे, तुषार देवघरे, मोतीराम पगार, कृष्णाबापू पगार, रमेश शिरसाठ हरिश्चंद्र पगार, भूषण पगार, राजेंद्र अमृतकार, नितीन पाटील, प्रा. निंबा कोठावदे, जितेंद्र कोठावदे, बापू देवघरे, अरविंद कोठावदे, बिंदूनाना उपासनी, प्रसाद उपासनी, नामदेव पगार, साहेबराव पगार, अविनाश पगार आदि उपस्थित होते. गेल्या शुक्रवारी श्री हनुमान सहस्त्र नामावली कार्यक्र म संपन्न होऊन रामनवमी व श्रीराम कथा समारोप कार्यक्र म श्री श्री १००८ इंद्रदेव महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला रामनवमी निमित्ताने कीर्तनकेसरी संजय धोंडगे यांचे कीर्तन झाले .श्री हनुमान मंदीर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने कळवणकराना मंत्रमुग्ध केले , यावेळी श्री हनुमान मंदीर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांचा चांदीची गदा ,शाल श्रीफळ देऊन सन्मान केला ,श्री हनुमान मंदिर उभारणीसाठी गेली चार वर्ष मंदिरासाठी लागणारा दगड ,शिवाय जेसीबी मशीन यासह भरीव देणगी देऊन श्री हनुमान मंदिर उभारणीत महत्वपूर्ण योगदान देणारे कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार व भूषण पगार यांचा श्री हनुमान मंदीर समिती व कळवणकर जनतेच्या वतीने चांदीची गदा शाल श्रीफळ देवून यावेळी सन्मान करण्यात आला. (वार्ताहर)मंदिर उभारणीसाठी विनामुल्य सहकार्य करणारे वास्तुविशारद श्री दीक्षति यांच्यासह ठेकेदार ,डिझायनर ,इलेक्तिट्रशियन ,देणगीदार यांचा श्री हनुमान मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला , श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सुनील महाजन यांचा कळवण नगरपंचायतीतर्फे कौतिक पगार यांनी सत्कार केला. यावेळी आयोजित महाप्रसाद कार्यक्र माचा कळवण शहर व तालुक्यातील २५ हजार श्री हनुमान भक्तांनी लाभ घेतला ,पुरणपोळी ,रस ,बुंदीचा लाडू आणि मसालेभात असलेल्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गांधी चौक ,सुभाषपेठ ,विठ्ठल मंदिर परिसर व श्री अंबिका पतसंस्था परिसरात गर्दी उसळली होती ,यावेळी सुनील महाजन ,नंदकुमार खैरनार ,कौतिक पगार ,मुरलीधर पगार ,सुधाकर पगार ,कृष्णा पगार ,परशुराम पगार ,सुनील शिरोरे ,संजय मालपुरे ,अनिल कोठावदे ,निंबा कोठावदे ,मोतीराम पगार तुषार देवघरे ,राजेंद्र अमृतकार ,साहेबराव पगार ,हरिभाऊ पगार ,अतुल पगार अविनाश पगार ,जयेश पगार ,के के शिंदे ,भूषण पगार ,नितीन अमृतकर देविदास विसपुते ,हेमंत बोरसे ,योगेश पगार ,योगेश महाजन ,जितेंद्र कोठावदे ,प्रवीण कोठावदे ,नितीन पाटील आदी उपस्थित होते
हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार
By admin | Updated: April 17, 2016 00:10 IST