शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

सैन्यदलातर्फे ‘हँग ग्लायडर’ची चित्तथराक साहस मोहीम

By admin | Updated: November 25, 2015 00:46 IST

पोलाची ते नाशिक प्रवास : १३ व्या आर्टिलरी रेजिमेंटच्या जवानांचा सहभाग

कोल्हापूर : मंगळवारी सकाळी सकाळी सूर्यकिरणांसोबत उजळाईवाडी येथील विमानतळ परिसरात भले मोठे पतंगाच्या आकाराचे हँग ग्लायडर उतरले होते. हे कोणत्या प्रकाराचे विमान आहे, याबाबत नागरिकांना उत्सुकता असल्याने अनेकांनी विमानतळाच्या परिसरात गर्दी केली होती. मात्र, सैन्यदलातील आर्टिलरी रेजिमेंटच्या वतीने अ‍ॅडव्हेंचर्स स्पोर्टस्च्या प्रमोशनसाठी हे हँग ग्लायडर कोल्हापुरात दाखल झाल्याचे सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर याबाबतची उत्सुकता कमी झाली. सैन्यदलाच्या १३ व्या आर्टिलरी रेजिमेंटतर्फे दि. १६ ते २७ नोव्हेंबरदरम्यान केरळमधील पोलाची ते महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत ‘हँग ग्लायडर’ या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. साहसी प्रयोग हा लष्करी प्रशिक्षणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.हँग ग्लायडिंग हा जगातील साहसी क्रीडाप्रकारांतील एक खेळ आहे. या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सैन्यदलातर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशात झेप घेऊन या साहसी खेळाचा प्रसार सैन्यदलाचे जवान करणार आहेत.पतंगाच्या आकाराचे दोन भले मोठे ग्लायडर वापरण्यात येते. सुमारे १५ हॉर्स पॉवरचे, टू स्ट्रोक इंजिन असलेले हे हँग ग्लायडर जमिनीपासून ४०० ते ५०० फूट उंचीवर जाते. छोट्या विमानाप्रमाणे व्यक्ती त्याच्यासोबत उडू शकतो. हा साहसी प्रयोग लष्करी प्रशिक्षणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या साहसी प्रयोगांचे उद्दिष्ट पूर्ण लष्करी पलटणीवर बिंबविलेले असते, असे लेफ्टनंट कर्नल विवेक कुमार यांनी सांगितले. दोन जवान ग्लायडरद्वारे उड्डाण करीत साताऱ्याकडे रवाना झाले. या टीमचे कर्नल आर. के. मिश्रा हे नेतृत्व करीत आहेत. यासह लेफ्टनंट कर्नल विकेश कुमार, नायब सुभेदार माणकेश सिंग, हवालदार मंगल देबबर्मा, रवींदर सिंग, ए. सेल्व्हम, संजीव कुमार, सतीश कुमार, एम. डी. बर्मा, देवरे गोकुळ, नागराज यांचा समावेश आहे....असा आहे प्रवासपोलाची, मंगलोर, कुमठा, दक्षिण गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सातारा, देहू रोड व नाशिक.