बिटको महाविद्यालयामागे हांडे मळा येथे शंभर वर्षांपूर्वी धोंडीबा हांडे यांनी महानुभाव पंथाचे एक मुखी श्री दत्त मंदिरची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे मंदिरातील श्री एकमुखी दत्ताच्या मूर्तीला मुकुट घातल्यानंतर ती श्रीकृष्णाच्या रूपासारखी दिसते.
हांडे मळ्यात सुमारे शंभर वर्षांपूर्वी धोंडीबा हांडे यांनी महानुभाव पंथाच्या श्री एकमुखी दत्त मूर्तीची व मंदिराची स्थापना केली. महानुभाव पंथाचे व परिसरातील भाविकांचे श्री एकमुखी दत्त मंदिर श्रद्धास्थान आहे. मंदिरामध्ये श्री दत्त जयंती व श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे साजरी केली जातात. विशेष म्हणजे मंदिरातील श्री एकमुखी दत्ताची मूर्ती हिला मुकुट घातल्यानंतर ती श्रीकृष्णाच्या रूपात दिसते . श्री दत्त जयंतीला मंगळवारी पहाटे पूजा त्यानंतर सकाळी पारायण झाल्यानंतर विडा अवसर कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वाजता अभिषेक, पूजा आणि सायंकाळी दत्त जन्मोत्सव सोहळा महाआरती करून महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. श्री दत्त जयंतीला भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात; मात्र कोरोनामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी नियमांचे पालन केले जाणार आहे.
फोटो
२८हांडे मळा दत्त मंदिर