शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा गोबापूर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा महिन्यापासून खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:24 IST

कळवण : तालुक्यातील गोबापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गोबापूर, खांडवीपाडा, पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री या गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीच्या कारणावरून बंद करण्यात आल्यामुळे या चार गावांना महिन्यांपासून पाणी नाही

ठळक मुद्देहंडा मोर्चा काढून घेरावपिण्याच्या पाण्यासाठी हाल

कळवण : तालुक्यातील गोबापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गोबापूर, खांडवीपाडा, पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री या गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीच्या कारणावरून बंद करण्यात आल्यामुळे या चार गावांना महिन्यांपासून पाणी नाही त्यामुळे गोबापूरच्या संतप्त आदिवासी महिलांनी गोबापूर ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून घेराव घातला. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा तहसील कार्यालय व पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही महिलांनी यावेळी दिला. ग्रामपंचायत गोबापूर व महावितरण यांच्यात तू तू-मै मै चालले आहे. थकबाकी वसुली मोहीम महावितरणने सुरु केली आहे, तर थकबाकी भरण्याची ग्रामपंचायतकडे तरतूद नसल्याने दोन्ही विभागाने घेतलेल्या आडमुठे धोरणामुळे आदीवासी जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. तालुक्यातील १३३ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकीमुळे खंडीत झाल्याने या योजनांवरील गावामध्ये ही समस्या आहे. गोबापूर ग्रृप ग्रामपंचायत अंतर्गत गोबापूर , खांडवीपाडा , पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री येथील आदीवासी बांधवांनीच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गोबापूर येथील महिलांनी वीजवितरण कंपनी व ग्रामपंचायत प्रशासन विरोधात हंडा मोर्चा काढुन ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला. गोबापूर, खांडवीपाडा, पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री या गावांतील सार्वजनीक पाणीपुरवठा योजनेचे अनेक वर्षांपासून १० लाखांहून अधिक रकमेचे वीजबिल थकलेले आहे. आदिवासी गाव असल्याने महीनाभरापासून पाणीपुरवठा बंद असूनही लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना येथील आदीवासी महिलांची आहे.त्यामुळे शनिवारी दुपारी एक वाजता संतप्त आदीवासी महिलानी रणरणत्या उन्हात ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी गोबापूर गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.