शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अनधिकृत मंगलकार्यालयांवर सोमवारपासून हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:49 IST

अनधिकृत वापर : शहरातील १६६ मंगलकार्यालये, लॉन्सवर होणार कारवाई

ठळक मुद्देअधिकमासामुळे लग्नतिथी नसल्याने महापालिकेने कारवाईची तयारी केली असून कारवाईपूर्वीच काही लॉन्सचालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेण्यास सुुरूवात केली आहेलॉन्स व मंगलकार्यालयांमध्ये अनधिकृतपणे शेड उभारणी, पक्की बांधकामे करण्यात आलेली आहेत

नाशिक - महापालिकेच्या नगररचना विभागाने नियमबाह्य आणि अनधिकृत वापराबद्दल नोटीसा बजावल्यानंतर शहरातील १६६ मंगल कार्यालये आणि लॉन्सवर येत्या सोमवार (दि.२१) पासून हातोडा पडणार आहे. अधिकमासामुळे लग्नतिथी नसल्याने महापालिकेने कारवाईची तयारी केली असून कारवाईपूर्वीच काही लॉन्सचालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेण्यास सुुरूवात केली आहे.महापालिकेच्या नगररचना विभागाने स्थायी समितीने केलेल्या आदेशानुसार, चार महिन्यांपूर्वी शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स यांचे सर्वेक्षण केले असता सुमारे १६६ मंगल कार्यालये, लॉन्स हे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेने या संबंधिताना त्यानुसार नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेकडे असलेल्या नोंदीनुसार शहरातील केवळ पाचच लॉन्स व मंगलकार्यालये अधिकृत आहेत. उर्वरित लॉन्स व मंगलकार्यालयांमध्ये अनधिकृतपणे शेड उभारणी, पक्की बांधकामे करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या नोटीसा गेल्यानंतर काही लॉन्सचालकांनी शासनाच्या अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरणाच्या धोरणानुसार नगररचना विभागाकडे प्रस्तावही दाखल केलेले आहेत परंतु, त्यांची संख्या खूपच अल्प असल्याचे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत वापराबद्दल लॉन्स व मंगलकार्यालयांवर कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट केल्यानंतर लॉन्सचालकांनी नगररचना विभागाकडे येऊन बांधकामे नियमितीकरणाविषयी चाचपणी केली परंतु, नियमितीकरणासाठी कंपाऊंडिंग चार्जेस हे अवाजवी असल्याने अनेकांनी कारवाई सुरू होण्यापूर्वीच स्वत:हून बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता महापालिकेने येत्या सोमवार (दि.२१) पासून लॉन्स व मंगलकार्यालयांचे अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय घेतल्याने दोन दिवसात बांधकाम काढून घेण्यास अधिक गति येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूररोडवरील लॉन्स व मंगलकार्यालयांपासून मोहीमेला सुरूवात होण्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखविली आहे.नियमितीकरणाला प्रतिसाद अल्पशासनाच्या अनधिकृत बांधकाम धोरणानुसार, संबंधित मंगल कार्यालये व लॉन्सचालक यांना आपले अनधिकृत बांधकाम दंड भरून नियमित करता येणार आहे. त्यासाठी सुमारे पाच ते ४० लाखांपर्यंतचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. त्यातून महापालिकेला सुमारे ३५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, कंपाउंडिंग चार्जेस भरून सदर बांधकामाच्या नियमितीकरणाला आतापर्यंत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दंडापोटी लाखो रुपये महापालिकेला मोजण्यापेक्षा स्वत:हून बांधकाम काढून घेणे अनेकांनी पसंत केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका