शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात मेनरोडसह भद्रकालीत व्यापा-यांच्या अतिक्रमित बांधकामांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:52 IST

महापालिकेची कारवाई : व्यावसायिकांनी केलेले वाढीव बांधकाम, शेडस् हटविले

ठळक मुद्देमहापालिकेने प्रस्तावित हॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टप-या हटविल्या.पश्चिम आणि पूर्व विभागाने बुधवारी (दि.२७) संयुक्तरित्या अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली

नाशिक - महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी (दि.२७) मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन या भागात व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानासमोर केलेल्या वाढीव बांधकामांसह शेडस् हटविण्याची कारवाई केली. महापालिकेने प्रस्तावित हॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टप-या हटविल्या.शहरातील मध्यवर्ती भागात प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन, धुमाळ पॉर्इंट या परिसरात रस्त्यावरील फेरीवाल्यांबरोबरच स्थानिक व्यापारी-व्यावसायिकांनीही आपल्या दुकानांसमोर अतिक्रमण केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. बव्हंशी व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानाच्या फलकासमोर पत्र्याचे शेड तसेच दुकानासमोर माल लावत अतिक्रमण केल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. पादचा-यांनाही या रस्त्यांतून मार्ग काढणे अवघड होऊन बसले होते. काही व्यावसायिकांनी तर फेरीवाल्यांना आपल्या दुकानांसमोर जागा देत त्यांच्याकडून भाडे वसुलीही सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. काही दिवसांपूर्वीच भद्रकालीतील अब्दुल हमीद चौक परिसरात थेट रस्त्यावरच दुकाने थाटली गेल्याने स्थानिक व्यावसायिकांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पश्चिम आणि पूर्व विभागाने बुधवारी (दि.२७) संयुक्तरित्या अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली. भद्रकाली परिसरापासून मोहीमेस सुरूवात करण्यात आली. त्यानंतर नेहरुचौक ते धुमाळ पार्इंट दरम्यान मोहीम राबवत व्यापारी-व्यावसायिकांनी उभारलेले शेड हटविण्यात आले. रस्त्यालगत काही विक्रेत्यांच्या टप-याही हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर आणि पूर्वच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे ३५ कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह मोहीमेत सहभागी झाले होते.मातंगवाड्यातील टप-या हटवल्यामहापालिकेने  फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. मातंगवाडा येथे हॉकर्स झोनमध्ये असलेल्या टप-या हटविण्याची कारवाई यावेळी करण्यात आली. तसेच प्रभात थिएटरमागील महापालिकेच्या गाळ्यांभोवती करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवरही जेसीबी चालविण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका