शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजारवर उद्या पुन्हा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:44 IST

अंबड-लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारवर गुरुवारी (दि.१२) हातोडा पडणार असून, महापालिकेने कारवाईची तयारी चालविली आहे. दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह पोलिसांनी संयुक्तरीत्या भंगार बाजार परिसरात संचलन केले.

नाशिक : अंबड-लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारवर गुरुवारी (दि.१२) हातोडा पडणार असून, महापालिकेने कारवाईची तयारी चालविली आहे. दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह पोलिसांनी संयुक्तरीत्या भंगार बाजार परिसरात संचलन केले.महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची ऐतिहासिक कारवाई केली होती. मात्र, काही महिने लोटताच पुन्हा एकदा भंगार मालाच्या विक्रेत्यांनी आपले व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली. महापालिकेने सदर भंगार बाजार व्यावसायिकांना वारंवार इशारे देऊनही त्यांनी आपल्याच जागांवरील व्यावसायिक अतिक्रमण हटविलेले नाही. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा भंगार बाजारावर हातोडा चालविण्याची तयारी केली. पोलीस आयुक्तालयाने त्याबाबत गुरुवार, दि. १२ आॅक्टोबरपासून पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापालिकेने कारवाईची तयारी सुरू केली. त्यानुसार, येत्या गुरुवारी सकाळपासून कारवाईस प्रारंभ केला जाणार असून, त्यासाठी सात पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात एक पथक राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, विभागीय अधिकारी यांच्यासह कर्मचाºयांचा समावेश असणार आहे. पोलीस आणि महापालिका दोन्ही मिळून एकूण ७०० कर्मचारी तैनात केले जाणार आहे. याचवेळी प्रत्येक पथकात ६ डम्पर, ३ जेसीबी, २ क्रेन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.