शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर परिसरात ९० अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:13 IST

महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या धडक अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सातपूर परिसरातील त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत पक्के बांधकाम, पत्र्याचे शेड हटविण्यात आले. दिवभरात सुमारे नव्वदहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आल्याने ही सर्वात मोठी मोहीम समजली जात आहे. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

सातपूर : महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या धडक अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सातपूर परिसरातील त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत पक्के बांधकाम, पत्र्याचे शेड हटविण्यात आले. दिवभरात सुमारे नव्वदहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आल्याने ही सर्वात मोठी मोहीम समजली जात आहे. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. बुधवारी (दि. २८) सकाळी ११ वाजेपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयापासून सुरू झालेल्या कारवाईत रस्त्याच्या कडेला व्यावसायिकांनी अतिक्रमित केलेले पक्के बांधकाम आणि पत्र्याचे शेड हटविण्यात आले. ही मोहीम सातपूर कॉलनी कॉर्नरपर्यंत राबविण्यात आली. विशेष म्हणजे, सातपूर परिसरात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत एका नगरसेवकाचे अतिक्र मण हटविण्यात आले, तर सातपूर पोलीस चौकीवर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि ग्रामीण बसस्थानकावरील पत्र्याचे शेडदेखील हटविण्यात आले. पोलीस चौकीचे अतिक्रमण हटविण्यात आल्याने कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचा संदेश अतिक्रमणधारकांना मिळाला. निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चार विभागांतील सुमारे ५० कर्मचाºयांनी पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविली. मोहिमेची खबर लागताच बहुतांशी व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमित पत्र्याचे शेड काढून घेतले होते.मोहीम सुरूच राहणारयापुढेही ही मोहीम अशीच राबविण्यात येणार असून, ज्यांनी अतिक्र मण केलेले आहे त्यांनी ते काढून घ्यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी दिला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका