शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे काम फत्ते; आता अर्धेच बाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:03 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीचा हा संपूर्ण परिसर गोसावी सरांनी संमेलनासाठी उपलब्ध करून दिल्याने साहित्य संमेलनाचे निम्मे काम फत्ते झाले आहे. आता संमेलन आयोजनाचे अर्धेच काम बाकी असून आपण सर्व नाशिककर मिळून साहित्यिक आणि रसिकांचे यथोचित आदरातिथ्य करून संमेलन पार पाडू, असा विश्वास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : संमेलनस्थळाची केली पाहणी

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचा हा संपूर्ण परिसर गोसावी सरांनी संमेलनासाठी उपलब्ध करून दिल्याने साहित्य संमेलनाचे निम्मे काम फत्ते झाले आहे. आता संमेलन आयोजनाचे अर्धेच काम बाकी असून आपण सर्व नाशिककर मिळून साहित्यिक आणि रसिकांचे यथोचित आदरातिथ्य करून संमेलन पार पाडू, असा विश्वास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. कविवर्य कुसुमाग्रज आणि वसंत कानेटकर यांचे वास्तव्य लाभलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार आणि यशस्वी होईल, असा विश्वास गोएसो कॅम्पसच्या पाहणीनंतर भुजबळ यांनी व्यक्त  केला.साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी रविवारी सकाळी भुजबळ फार्म कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासोबत पाहणी दौरा केला. कॅम्पसमधील सोयी-सुविधांच्या पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत समाधान व्यक्त केले. तसेच संमेलनाच्या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल, असेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिककर म्हणून आलेल्या पाहुण्यांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संमेलन सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येऊन पूर्णवेळ या ठिकाणी ते काम बघतील असेही त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनासाठी योग्य जागेची निवड करण्यात आलेली  आहे. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा कशा मिळतील, याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या. यावेळी गोखले एज्युकेशनचे प्रमुख प्राचार्य मो. स. गोसावी सर, शैलेश गोसावी, प्राचार्य राम कुलकर्णी, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, लक्ष्मण सावजी, लोकेश शेवडे, शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे, योगेश कमोद, सुनील भुरे, किरण समेळ आदी उपस्थित होते.सहस्त्रचंद्र दर्शनाचा विषयच नव्हताशरद पवार यांचे सहस्त्रचंद्र दर्शन या संमेलनाच्या माध्यमातून करणे किंवा त्या विचारातून संमेलन नाशिकला भरवणे असा काही विषयच नव्हता. साहित्य महामंडळ काही करणार असेल, तर तो त्यांचा विषय असून त्याबाबत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महामंडळ निर्णय घेईल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकChhagan Bhujbalछगन भुजबळ