सिडको : मालेगावहून मुंबईला सुमारे दीड टन मांस घेऊन जाणाऱ्या वाहनास प्राणिमित्र गौरव क्षत्रिय व विकास गुंजाळ या दोघांनी अंबड पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून विल्होळी जकात नाक्यावर पकडले़ या प्रकरणी पोलिसांनी चारचाकी वाहनासह चालक व क्लिनरला अटक केली आहे़ या दोघांवर अंबड पोलीस ठाण्यात प्राणीसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मालेगावमधून पिकअप वाहनाद्वारे मुंबईला गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती प्राणिमित्र गौरव क्षत्रिय व विकास गुंजाळ यांना मिळाली होती़ त्यानुसार या दोघांनी पिंपळगाव बसवंत टोलनाका गाठून वाहनाची प्रतीक्षा करीत असताना त्यांना वाहनाचा नंबरही (एमएच ४१, जी १२२९) मिळाला़ टोलनाक्यावर ठाण मांडल्यानंतर साडेअकराच्या सुमारास पिकअप त्याठिकाणी आली़ यानंतर नाशिकच्या दिशेने सुसाट निघालेल्या पिकअपचा त्यांनी पाठलाग सुरू केला़ ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने हॉटेल जत्राजवळून वाहन वेगळ्या मार्गाने काढले़या दोघांनाही चकमा देऊन निघालेले वाहन दिसेनासे झाल्याने त्यांनी उड्डाणपुलावरून जाण्याचा निर्णय घेतला़ तेव्हा द्वारका परिसरात ही पिकअप जाताना दिसली व त्यांनी पुन्हा पाठलाग सुरू केला़ यावेळी सावधगिरी बाळगत व विशिष्ट अंतर ठेवून त्यांनी अंबड पोलिसांना याबाबत माहिती देऊन मदत मागितली़ यानंतर हे वाहन विल्होळी नाक्यावर अडविण्यात आले. वाहनात काय आहे याची विचारणा केली असता वाहनचालक संशयित शेख याकूब आयुब (२६, रा. पवारवाडी, मालेगाव) व शेख वसिम सलीम (१९, मालेगाव) या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ या मांसाचे परीक्षण डॉ़ संजय महाजन यांनी करून मांसाचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात येणार आहेत़ दरम्यान, अंबड पोलिसांनी पिकअप वाहन व दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे़ (वार्ताहर)
दीड टन गोमांस जप्तअंबड पोलिसांची कारवाई :
By admin | Updated: March 28, 2016 00:04 IST